याड लागलं गं याड लागलं... Bigg Boss च्या घरात प्रेमाचे वारे, प्रणित मोरे पडलाय प्रेमात, कोणी काढली विकेट?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Pranit More : 'बिग बॉस 19'च्या घरात मराळमोळ्या प्रणित मोरे क्रिकेटपटूच्या बहिणीच्या प्रेमात पडला असल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
1/7

'बिग बॉस 19' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय वादग्रस्त कार्यक्रम असून नुकताच या घरात एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. डेंग्युमुळे घराबाहेर पडलेला या पर्वाचा दमदार खेळाडू अर्थात प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा घरात दाखल झाला आहे.
advertisement
2/7
प्रणित मोरेच्या रिएन्ट्रीने तान्या आणि फरहाना सोडून इतर सर्व सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. पण या सगळ्यात क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर मात्र भलतीच आनंदी झालेली पाहायला मिळाली.
advertisement
3/7
प्रणित मोरे 'बिग बॉस 19'च्या घराबाहेर पडल्यानंतर मालती चहर नाराज झालेली पाहायला मिळाली. प्रणित नसतानाही मालती त्याच्याबद्दलच बोलताना दिसून आली. प्रणितमुळे 'बिग बॉस 19'च्या घरात सकारात्मक वातावरण निर्माण होतं, असं मालती म्हणाली होती.
advertisement
4/7
प्रणितची 'बिग बॉस 19'च्या घरात पुन्हा एन्ट्री झालेली पाहून मालती चहर भावूक झालेली पाहायला मिळाली.
advertisement
5/7
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मालती प्रणितला मिठी मारताना दिसत आहे.
advertisement
6/7
प्रणित आणि मालतीचा हा खास बॉन्ड नेटकऱ्यांच्या आणि बिग बॉसप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे.
advertisement
7/7
प्रणित आणि मालकी एकमेकांना आपल्या प्रेमाची कबुली कधी देणार याकडे प्रेक्षकांचं आता लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
याड लागलं गं याड लागलं... Bigg Boss च्या घरात प्रेमाचे वारे, प्रणित मोरे पडलाय प्रेमात, कोणी काढली विकेट?