Guess Who : बिग बॉसने बदललं नशीब, आता होणार IPL स्टारची दुसरी बायको, ही अभिनेत्री कोण?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Famed Actress Second Marriage : कोणाचं नशीब कधी बदलेल काही सांगत येत नाही. अशात एका अभिनेत्रीचं नशीब इतकं बदललं की आता ती थेट IPL स्टारशी लग्न करणार आहे. ही अभिनेत्री कोण?
advertisement
1/8

असं म्हणतात की बिग बॉसमध्ये आल्यानंतर कलाकारांचं नशीब बदलतं. काम न मिळणाऱ्या अनेक कलाकारांना बिग बॉसनंतर काम मिळतात. एका अभिनेत्रीचं असतं नशीब बदललं, आता ती आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटरशी लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
advertisement
2/8
ही अभिनेत्री 'बिग बॉस तमिळ'च्या सीझन 4 मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर तिची लोकप्रियता प्रचंड वाढली. ती मॉडेलिंग क्षेत्रात काम करत होती. आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजेच संयुक्ता.
advertisement
3/8
संयुक्ताने 2007 मध्ये 'मिस चेन्नई'चा किताब जिंकला होता. बिग बॉसमधून तिला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे ती सिनेइंडस्ट्रीतही लोकप्रिय झाली. त्यानंतर संयुक्ताने विजयच्या 'वारिसु' सिनेमातही काम केलं.
advertisement
4/8
संयुक्ताने 'कॉफी विथ लव्ह', 'तुघलक दरबार' आणि 'माय डियर भूतम' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं. अभिनेत्रीचं लग्न कार्तिकशी झाले आहे. त्यांना एक मुलगा देखील आहे. संयुक्ताचा पती कार्तिक काही दिवसांसाठी दुबईला गेला होता पण त्यानंतर तो परतला नाही. काही कारणांमुळे दोघांचा डिवोर्स झाल्याची माहिती मध्यंतरी समोर आली होती.
advertisement
5/8
अभिनेत्री संयुक्ता सध्या तिच्या मुलासोबत एकटीच राहत आहे. ती दुसऱ्या लग्नाची तयारी करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ती चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू आणि क्रिकेट कॉमेन्टेटर अनिरुद्ध श्रीकांतशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
advertisement
6/8
अभिनेत्री संयुक्ताने या चर्चांवर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. तिच्या उत्तराने तिच्या अफेअर्सच्या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. तिने अलीकडेच दिवाळीनिमित्त अनिरुद्ध श्रीकांतसोबतचा एक फोटो पोस्ट केला. त्यानंतर दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली.
advertisement
7/8
अभिनेत्री संयुक्ताने तिच्या अफेअर्सच्या चर्चांना उत्तर देत लिहिलं, "इंटरनेटवर सर्व काही आहे. जे काही आहे ते आहे." संयुक्ताच्या उत्तराने ती अनिरुद्ध श्रीकांतशी लग्न करणार असल्याची चर्चा बऱ्यापैकी पैकी असल्याचं दिसतंय.
advertisement
8/8
अनिरुद्ध श्रीकांत हा क्रिकेट दिग्गज कृष्णमाचारी श्रीकांत यांचा मुलगा आहे. अनिरुद्ध श्रीकांत काही सीझनसाठी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. इतकंच नाही तर अनिरुद्ध आता क्रिकेट कॉमेन्टेटरही आहे. त्याने 2012 मध्ये आरती वेंकटेशशी लग्न केले. काही वर्षांपूर्वी या दोघांचाही डिवोर्स झाला. अनिरुद्ध आणि संयुक्ता दोघेही घटस्फोटीत असून आता दोघेही एकमेकांशी लग्न करणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : बिग बॉसने बदललं नशीब, आता होणार IPL स्टारची दुसरी बायको, ही अभिनेत्री कोण?