Suraj Chavan Marriage : सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर! पण कुठे भेटली आयुष्याची जोडीदार? असे जुळले प्रेमाचे सूर
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Suraj Chavan Marriage: सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण आहे, ती त्याला कुठे भेटली, याबद्दलच्या चाहत्यांच्या प्रश्नांवर अंकिताने एक मजेदार खुलासा केला आहे.
advertisement
1/8

'बिग बॉस मराठी'च्या घरात आपल्या आयुष्यातील भावूक किस्से सांगून अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारा आणि 'झापुक झुपूक' फेम अभिनेता सूरज चव्हाण आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे. 'सूरज लग्न कधी करणार?' या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून, त्याचा विवाह सोहळा अगदी जवळ आला आहे.
advertisement
2/8
काही दिवसांपूर्वी सूरजने होणाऱ्या पत्नीचा चेहरा न दाखवता फोटो शेअर केल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आता लग्नाची तारीख, ठिकाण आणि वधू कोण आहे, यावर 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर हिने खुलासा केला आहे.
advertisement
3/8
एका मुलाखतीत अंकिता वालावलकरने सूरजच्या लग्नाची माहिती दिली. सूरज चव्हाणचा पारंपरिक विवाह सोहळा २९ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील जेजुरी, सासवड येथे पार पडणार आहे. लग्नाच्या मुख्य समारंभापूर्वीचे विधी २८ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत, ज्यात हळद, मेहंदी आणि संगीत यांसारखे पारंपरिक सोहळे रंगणार आहेत.
advertisement
4/8
सूरज चव्हाणची होणारी पत्नी कोण आहे, ती त्याला कुठे भेटली, याबद्दलच्या चाहत्यांच्या प्रश्नांवर अंकिताने एक मजेदार खुलासा केला आहे. सूरजच्या होणाऱ्या पत्नीचे नाव संजना असून ती सूरजच्या चुलत मामाची मुलगी आहे.
advertisement
5/8
विशेष म्हणजे, त्यांचे हे लग्न अरेंज मॅरेज नसून लव्ह मॅरेज आहे. सूरज आणि संजना एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. म्हणजेच, नात्यातील मुलगी असली तरी दोघांमध्ये प्रेम फुलल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी लग्नाला संमती दिली आहे.
advertisement
6/8
अंकिता वालावलकरने केवळ ही माहितीच दिली नाही, तर तिने सूरज आणि संजनाला लग्नाच्या तयारीसाठी मदतही केली आहे. अंकिताने नुकतेच तिच्या घरी सूरज आणि संजनाचे केळवण केले आणि त्यांना भेटवस्तूही दिल्या.
advertisement
7/8
तिने दोघांनाही लग्नाच्या शॉपिंगसाठी मदत केली, ज्याचा खास व्लॉग तिने तिच्या चॅनलवर शेअर केला आहे.
advertisement
8/8
'बिग बॉस'मधून बाहेर पडल्यानंतर सूरजने चित्रपटामध्ये काम केले, ज्याची बरीच चर्चा झाली होती. आता आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी चाहते सूरज आणि संजनावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suraj Chavan Marriage : सूरज चव्हाण चढणार बोहोल्यावर! पण कुठे भेटली आयुष्याची जोडीदार? असे जुळले प्रेमाचे सूर