Bigg Boss marathi 6 च्या घरात तुफान राडा! 'बीबी फार्म' टास्कदरम्यान विशाल-ओमकारमध्ये हाणामारी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 मध्ये पहिल्याच आठवड्यात 9 सदस्य नॉमिनेट झालेत. तर दुसरीकडे घराला पहिला कॅप्टन मिळणारआहे. मात्र कॅप्टन्सी टास्कमध्ये स्पर्धकांमध्ये हाणामारी झाली.
advertisement
1/8

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाचा पहिलाच आठवडा सदस्यांनी चांगलाच गाजवत आहेत. टास्क जिंकण्यासाठीची चढाओढ आणि नॉमिनेशन टास्कमध्ये सगळ्यांचे खरे रंग समोर आलेत.
advertisement
2/8
पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी प्रभू शेळके, दीपाली सय्यद, कारण सोनावणे, दिव्या शिंदे, सागर कारंडे, रोशन भजनकर, अनुश्री माने, राधा पाटील, रुचिता जामदार हे 9 सदस्य नॉमिनेट झाले आहेत.
advertisement
3/8
आजच्या भागात घरात कॅप्टन्सी टास्क पार पडणार आहे. दरम्यान या टास्कमध्ये चांगलीच हाणामारी झालेली पाहायला मिळणार आहे. सदस्यांनी टास्कसाठी थेट एकमेकांचे गळे पडकल्याचं दिसतंय.
advertisement
4/8
पहिल्या आठवड्यात कॅप्टन्सीसाठी 'बीबी फार्म' हा टास्क पार पडणार आहे ज्यात समर्थकांमध्ये झुंज पाहायला मिळणार आहे.
advertisement
5/8
या टास्कसाठी स्पर्धकांची दोन गटांत विभागणी करण्यात येणार आहे. शेतातील कापूस आणि इतर मालमत्ता जमा करण्याच्या या खेळात स्पर्धकांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे पाहायला मिळाले.
advertisement
6/8
दुखापत आणि ड्रामा हे तर टास्क म्हंटल म्हणजे आलचं. प्रोमोमध्ये दिसल्याप्रमाणे, विशाल आणि ओमकार यांच्यात झटापट झाली. विशालने ओमकारचा गळा पडकल्याचंही दिसतंय.
advertisement
7/8
नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील 9 सदस्यांवर इविक्शनची टांगती तलवार आली आहे. या प्रक्रियेत स्पर्धकांनी एकमेकांवर गंभीर आरोप करत एकमेकांना नॉमिनेट केले. नॉमिनेटेड सदस्य यांमध्ये कोण टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे कळेलच.
advertisement
8/8
त्याचप्रमाणे विशाल आणि ओमकार यांच्यात झालेल्या हाणामारीवर बिग बॉस काय निर्णय घेणार? इतकंच नाही तर विकेंडला भाऊच्या धक्क्यावर भाऊ काय शाळा घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss marathi 6 च्या घरात तुफान राडा! 'बीबी फार्म' टास्कदरम्यान विशाल-ओमकारमध्ये हाणामारी