TRENDING:

Green Peas : वर्षभर मटार कसे साठवायचे? आजीच्या शिदोरीतील 'ही' पद्धत गृहिणींच्या कामाची

Last Updated:
आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी मटार साठवून (Store Green Peas) ठेवू शकता आणि वर्षभर त्यांची ताज्या मटारसारखी चव घेऊ शकता.
advertisement
1/10
वर्षभर मटार कसे साठवायचे? आजीच्या शिदोरीतील 'ही' पद्धत गृहिणींच्या कामाची
हिवाळ्याचा ऋतू आला की बाजारात सगळीकडे हिरवेगार, टवटवीत आणि गोड मटार दिसू लागतात. गृहिणींसाठी हा काळ म्हणजे सणच असतो. कचोरी असो, मटार पनीर किंवा गरमागरम पुलाव. ताज्या मटारची चव कशालाच येत नाही. पण जसा हिवाळा संपू लागतो, तसे बाजारातून हे गोड मटार गायब होतात आणि त्यांची जागा घेतात ते महागडे किंवा चव नसलेले फ्रोजन मटार.
advertisement
2/10
अनेकदा आपण विचार करतो की, "हे मटार वर्षभर असेच ताजे राहिले असते तर?" तुमची हीच अडचण सोडवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही घरच्या घरी मटार साठवून (Store Green Peas) ठेवू शकता आणि वर्षभर त्यांची ताज्या मटारसारखी चव घेऊ शकता.
advertisement
3/10
मटार वर्षभर साठवण्याची सर्वात सोपी पद्धत: स्टेप-बाय-स्टेपबाजारातून मिळणारे फ्रोजन मटार विकत घेण्यापेक्षा घरी साठवणे स्वस्त आणि आरोग्यदायी असते. यासाठी खालील 'ब्लँचिंग' (Blanching) पद्धतीचा अवलंब करा:
advertisement
4/10
1. मटारची निवड आणि तयारीसर्वात आधी बाजारातून चांगले भरलेले आणि हिरवेगार मटार विकत घ्या. ते सोलून दाणे वेगळे करा. कीड लागलेले किंवा पिवळे पडलेले दाणे बाजूला करा, कारण एका खराब दाण्यामुळे संपूर्ण साठा खराब होऊ शकतो.
advertisement
5/10
2. गरम पाण्यातील प्रक्रिया (Blanching)एका मोठ्या टोपात पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळू लागलं की त्यात 1 चमचा साखर टाका. साखरेमुळे मटारचा हिरवा रंग वर्षभर टिकून राहतो. आता मटारचे दाणे उकळत्या पाण्यात टाका. 2 मिनिटांनंतर जेव्हा दाणे पाण्यावर तरंगू लागतील, तेव्हा लगेच गॅस बंद करा.
advertisement
6/10
3. बर्फाच्या पाण्याचा वापरउकळत्या पाण्यातून मटार काढल्याबरोबर ते लगेच अतिशय थंड किंवा बर्फाच्या पाण्यात टाका. यामुळे मटार शिजण्याची प्रक्रिया थांबते आणि त्यांचा टवटवीतपणा कायम राहतो.
advertisement
7/10
4. कोरडे करणेथंड पाण्यातून मटार काढून ते एका सुती कपड्यावर पसरवा. पंख्याखाली 2-3 तास ठेवून त्यातील पूर्ण ओलावा (Moisture) सुकू द्या. लक्षात ठेवा, मटारवर पाणी राहिल्यास त्याला बर्फाचे गोळे तयार होतात आणि ते खराब होऊ शकतात.
advertisement
8/10
5. पॅकेजिंग आणि स्टोरेजमटार पूर्ण सुकल्यानंतर ते 'झिपलॉक बॅग' (Ziploc Bag) किंवा हवाबंद डब्यात भरा. पिशवीतील हवा पूर्ण काढून टाकून ती बंद करा. आता हे पाकीट फ्रीजरमध्ये (Freezer) ठेवा.
advertisement
9/10
मटार साठवताना 'या' 3 चुका टाळापाणी राहू देऊ नका: मटार पिशवीत भरण्यापूर्वी ते पूर्णपणे कोरडे असणे आवश्यक आहे. झिपलॉक बॅगमध्ये थोडी जागा रिकामी ठेवा, जेणेकरून फ्रीजरमध्ये मटार थोडे प्रसरण पावले तरी पिशवी फाटणार नाही. एकदा फ्रीजरमध्ये ठेवले की, गरजेनुसारच छोटे पाकीट बाहेर काढा. वारंवार तापमान बदलल्यास मटार खराब होतात.
advertisement
10/10
वर्षभर मटार साठवण्याचे फायदेहिवाळ्यात मटार स्वस्त असतात, तर उन्हाळ्यात त्यांचे भाव गगनाला भिडतात. घरी साठवल्याने पैशांची मोठी बचत होते. घरगुती फ्रोजन मटारमध्ये कोणतेही प्रिझर्व्हेटिव्हज किंवा कृत्रिम रंग नसतात. ऐनवेळी पाहुणे आले तर मटार सोलण्याचा वेळ वाचतो आणि तुम्ही झटपट डिश तयार करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/रेसिपी/
Green Peas : वर्षभर मटार कसे साठवायचे? आजीच्या शिदोरीतील 'ही' पद्धत गृहिणींच्या कामाची
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल