
नागपुरात काँग्रेसचे उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळले आहे, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांवर काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते रात्री उशीरा पर्यंत कार्यालयात थांबले होते. ते गेल्यावर भाजप कार्यकर्त्यांनी हा कारनामा केल्याचे काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणत आहेत.
Last Updated: Jan 15, 2026, 15:49 ISTमुंबई प्रभाग क्र. २ मध्ये भगवे गार्ड केंद्राबाहेर गोंधळ झाला आहे. मतदान केंद्राबाहेर मनसे आणि भाजपमध्ये राडा झाला आहे. भाजप आमदार मनिषा चौधरी यांच्या विरोधात हा वाद मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Last Updated: Jan 15, 2026, 16:47 ISTनाशिकमध्ये भाजपचे प्रभाग १७ मधील उमेदवार दिनकर आढाव यांच्या कारमध्ये पैसे सापडले आहेत.कारसह २ लाखांची रक्कम जप्त झाली आहे. तर विरोधकांनी मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर लावला आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 15:23 ISTभिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या समर्थकांना मारहाण झाली आहे. ही मारहाण माजी महापौर उल्हास पाटील यांच्या उमेदवारांना भाजपा आमदार महेश चौघुले यांच्या कार्यकर्त्यांकडून झाली आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 15:09 ISTनाशिकच्या सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर गोंधळ झाला आहे. पैसे वाटप होत असल्याच्या अफवेमुळे नागरिकांची गर्दी कार्यालयात झाली आहे. तेथील अधिकाऱ्यांनी गर्दी करणाऱ्या लोकांवर काठ्यांनी मार दिला आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 15:01 IST