TRENDING:

Bigg Boss Marathi 6 च्या घरातील राकेश बापटची EX-पत्नी कोण? शाहरुखसोबत आहे खास कनेक्शन

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात राकेश बापट आपल्या एक्स पत्नीबाबत बोलताना दिसून आला आहे. विशेष म्हणजे त्याच्या एक्स पत्नीचं शाहरुखच्या पत्नीसोबत खास कनेक्शन आहे.
advertisement
1/7
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील राकेश बापटची EX-पत्नी कोण?
'बिग बॉस मराठी 6'ला नुकतंच सुरुवात झाली असून स्पर्धकांना त्यांच्या घरच्यांची आठवण यायलादेखील सुरुवात झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या भागात राकेश बापट, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत, सचिन कुमावत आणि सोनाली राऊत हे स्पर्धक लग्न आणि जोडीदार या विषयांवर चर्चा करताना दिसले.
advertisement
2/7
दरम्यान राकेश बापटने त्याचं लग्न आणि घटस्फोट याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तसेच घटस्फोटानंतरही त्याने एक्स पत्नीसोबत मैत्री कायम ठेवली असल्याचंही तो यावेळी म्हणाला.
advertisement
3/7
'बिग बॉस मराठी 6'च्या घरात करण सोनावणेने राकेशला प्रश्न विचारला की, कामात व्यस्त असताना त्याने आपल्या जोडीदाराचा शोध कसा घेतला? यावर उत्तर देत राकेश म्हणाला,"मी काम करत असतानाच मला माझी जोडीदार भेटली होती".
advertisement
4/7
राकेश म्हणाला,"मी माझ्या मैत्रिणीसोबत लग्न केलं होतं. आम्ही एक शो करत होतो. इंडस्ट्रीमध्येच आमची भेट झाली आहे. शोदरम्यान एकमेकांना ओळखू लागलो. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो. त्यानंतर आम्ही नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला".
advertisement
5/7
राकेश पुढे म्हणाला,"लग्नासाठी त्यावेळी मी तिला विचारलं होतं. तिच्या होकारानंतर आम्ही लग्न केलं. आज लग्नाशिवाय आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत. आम्ही अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा असतो. तीदेखील माझ्या पाठीशी उभी असते. तिनेही लग्न केलेलं नाही आणि मीदेखील लग्न केलेलं नाही".
advertisement
6/7
राकेश बापट रिद्धी डोगरासोबत लग्नबंधनात अडकला होता. 'मर्यादा: लेकीन कब तक'च्या शूटिंगदरम्यान त्यांची मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि ते 2011 मध्ये विवाहबंधनात अडकले. 2019 मध्ये दोघांच्या सहमतीने त्यांचा घटस्फोट झाला होता. पण घटस्फोटानंतरही त्यांनी त्यांची मैत्री कायम ठेवली.
advertisement
7/7
रिद्धी डोगराने 'मर्यादा: लेकीन कब तक','असुर','द मॅरीड वुमन' आणि शाहरुखच्या 'जवान' या सिनेमात काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासह ती एक उत्तम नृत्यांगनादेखील आहे. सोशल मीडियावर रिद्धी सक्रीय असून सामाजिक आणि राजकीय विषयांवर आपली मतं मांडताना दिसून येते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 च्या घरातील राकेश बापटची EX-पत्नी कोण? शाहरुखसोबत आहे खास कनेक्शन
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल