TRENDING:

अमिताभ बच्चन एक झलक पाहण्यासाठी खेडेगावातून आला मुंबईत, आज बिग बींपेक्षाही 5 पट श्रीमंत, सुपरस्टारचा जबरा फॅन

Last Updated:
अमिताभ यांचा असा एक चाहता आहे, जो त्यांची एक झलक पाहण्यासाठी खेडेगावाहून मुंबईत आला. मात्र, सध्याच्या घडीला त्याची संपत्ती खुद्द अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही खूप जास्त आहे.
advertisement
1/11
अमिताभ बच्चनची एक झलक पाहण्यासाठी गाठली मुंबई, आज बिग बींपेक्षाही 5 पट श्रीमंत
मुंबई: बॉलिवूडचे महानायक अशी ज्यांची ओळख आहे, अशा अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. गेली ५० दशकांहून अधिक काळ इंडस्ट्री गाजवणारे बिग बी आज त्यांचा ८३ वा जन्मदिन साजरा करत आहेत.
advertisement
2/11
संपूर्ण देशभरात त्यांचे असंख्य चाहते आहेत. अमिताभ यांचा असा एक चाहता आहे, जो त्यांची एक झलक पाहण्यासाठी खेडेगावाहून मुंबईत आला. मात्र, सध्याच्या घडीला त्याची संपत्ती खुद्द अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही खूप जास्त आहे.
advertisement
3/11
कधीकाळी अहमदाबादच्या एका छोट्या वस्तीत राहणारा तो तरुण, या सुपरस्टारची केवळ एक झलक पाहण्यासाठी आसुसलेला होता. 'त्रिशूल' चित्रपट पाहून त्याने मनात निश्चय केला, "मलाही स्वतःची एक बांधकाम कंपनी उभी करायची आहे!"
advertisement
4/11
तोच साधा तरुण आज देशातील दहावा सर्वात मोठा रिअल इस्टेट व्यावसायिक बनला आहे. विशेष म्हणजे, ज्या सुपरस्टारची तो एक झलक पाहण्यासाठी धडपडत होता, आज त्याच सुपरस्टारच्या तुलनेत तो पाच पट श्रीमंत आहे.
advertisement
5/11
हा चाहता दुसरा तिसरा कोणी नसून, रिअल इस्टेट आणि चित्रपटसृष्टीत मोठे नाव कमावलेले आनंद पंडित आहेत. आनंद पंडित हे लहानपणापासूनच अमिताभ बच्चन यांचे खूप मोठे चाहते होते.
advertisement
6/11
'त्रिशूल' चित्रपटात बिग बींना एका छोट्या शहरातून येऊन यशस्वी बिल्डर बनताना पाहून, त्यांनी आपल्या आयुष्याची दिशा ठरवली. त्यांनी अहमदाबाद सोडले आणि 'श्री लोटस डेव्हलपर्स अँड रियल्टी लिमिटेड' या अब्जावधींच्या कंपनीची स्थापना केली.
advertisement
7/11
मुंबईत आल्यानंतर आनंद पंडित यांनी इतकी प्रगती केली की, काही वर्षांतच त्यांनी चक्क बच्चन साहेबांच्या 'जलसा' बंगल्याच्या मागे स्वतःचा बंगला विकत घेतला. यानंतर आदर्श अमिताभ यांचे शेजारी बनले. पुढे अमिताभ बच्चन यांनी पंडित यांच्याकडून जवळपास ५० कोटी रुपयांना तो बंगला विकत घेतला.
advertisement
8/11
आनंद पंडित आजही नम्रपणे सांगतात, "बच्चनसाहेब माझ्यासाठी कुटुंबासारखे आहेत. त्यांची नम्रता आणि साधेपणा यातून मी आयुष्य जगण्याची पद्धत शिकलो."
advertisement
9/11
आनंद पंडित आणि शाहरुख खानची मैत्रीही खूप खास आहे. किंग खानने अनेकदा आनंद पंडित यांना आपला स्पिरिच्युअल गुरु म्हटले आहे. आनंद पंडित यांना वास्तुशास्त्र खूप चांगल्याप्रकारे समजते आणि त्यांनी 'पठाण' व 'जवान' चित्रपटांच्या प्रदर्शनापूर्वी शाहरुखला अनेक एनर्जी बॅलन्सिंगचे सल्ले दिले होते, जे शाहरुखसाठी शुभ ठरले.
advertisement
10/11
आनंद पंडित यांनी २०१५ मध्ये 'प्यार का पंचनामा २' मधून चित्रपट निर्मितीची सुरुवात केली. यानंतर त्यांनी 'टोटल धमाल', 'ग्रेट ग्रँड मस्ती', आणि 'दृश्यम २' सारख्या हिट चित्रपटांची निर्मिती केली. तसेच, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या 'सरकार ३' आणि 'चेहरे' या चित्रपटांचीही निर्मिती केली आहे.
advertisement
11/11
आज हुरुन इंडियाच्या २०२५ च्या यादीनुसार, अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाची संपत्ती आनंद पंडित यांच्या ८,६६० कोटी रुपयांच्या संपत्तीपेक्षा पाच पट कमी आहे. छोट्या शहरातून आलेला अमिताभ बच्चन यांचा हा चाहता आज बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींचा मित्र आणि एका मोठ्या व्यावसायिक कंपनीचा मालक बनला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
अमिताभ बच्चन एक झलक पाहण्यासाठी खेडेगावातून आला मुंबईत, आज बिग बींपेक्षाही 5 पट श्रीमंत, सुपरस्टारचा जबरा फॅन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल