TRENDING:

'बायकांचे नवरे हडपेन...' राजेश खन्नाची हिरोईन, जिला घाबरायच्या लग्न झालेल्या महिला, कोण होती ती?

Last Updated:
Bollywood Actress : ही अभिनेत्री नकारात्मक भूमिकेमुळे इतकी लोकप्रिय झाली होती की, खऱ्या आयुष्यातही विवाहित महिला तिला पाहून घाबरून राहायच्या. त्यांना भीती वाटायची की, ही अभिनेत्री त्यांच्या पतीला पळवून नेत नाही ना!
advertisement
1/7
'बायकांचे नवरे हडपेन..' राजेश खन्नाची हिरोईन,जिला घाबरायच्या लग्न झालेल्या महिला
मुंबई: ७० च्या दशकातील बॉलिवूडमध्ये एक अशी व्हॅम्प अभिनेत्री होती, जिच्याबद्दलची उत्सुकता पडद्यावरील मुख्य नायिकेपेक्षाही जास्त असायची! राजेश खन्ना यांच्यासोबत १३ चित्रपटांमध्ये काम करणारी, धर्मेंद्रसोबत दिसणारी आणि विशेषतः प्रेम चोप्रासोबत तिची जोडी गाजवणारी ही अभिनेत्री नकारात्मक भूमिकेमुळे इतकी लोकप्रिय झाली होती की, खऱ्या आयुष्यातही विवाहित महिला तिला पाहून घाबरून राहायच्या. त्यांना भीती वाटायची की, ही अभिनेत्री त्यांच्या पतीला पळवून नेत नाही ना!
advertisement
2/7
बॉलिवूड सिनेमातील ही 'बॅड गर्ल' दुसरी कोणी नसून, आपल्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री बिंदू देसाई आहेत, ज्यांना 'मोना डार्लिंग' या नावानेही ओळखले जायचे. त्यांनी कधी पडद्यावर भांडखोर सासू म्हणून सुनांना त्रास दिला, तर कधी गँगस्टरच्या प्रेयसीची भूमिका करून पडद्यावर राज्य केले.
advertisement
3/7
बिंदू देसाई यांचे वडील नानूभाई देसाई यांना वाटत होते की, त्यांनी डॉक्टर किंवा इंजिनीअर बनावे, पण बिंदूला सिनेमाची आवड होती. त्यांचा चेहरा व्हॅम्पसाठी योग्य असल्यामुळे त्यांना मुख्य नायिकेचे रोल मिळाले नाहीत. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर पडली आणि याच गरजेपोटी त्यांनी चित्रपटसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यांचे जीजू लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी त्यांना मदत केली.
advertisement
4/7
१९६२ मध्ये 'अनपढ़' चित्रपटात त्यांनी साइड रोल केला, पण तो चित्रपट फ्लॉप झाला. पण, १९६९ मध्ये आलेला चित्रपट 'दो रास्ते' त्यांच्यासाठी लकी ठरला. या चित्रपटात त्यांनी नकारात्मक भूमिका साकारली.
advertisement
5/7
एका मुलाखतीत बिंदू यांनी खुलासा केला होता की, सुरुवातीला त्यांना नकारात्मक भूमिका करायची नव्हती, पण कुटुंबाने सांगितले की एक तुक्का मारून पाहूया. 'दो रास्ते' हिट ठरला आणि बिंदू यांचे आयुष्यच बदलले. यानंतर त्यांनी 'इत्तफाक', 'आया सावन झूम के', 'डोली', 'कटी पतंग' आणि 'जंजीर' यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले.
advertisement
6/7
पडद्यावर बिंदू यांना सतत नकारात्मक भूमिका मिळू लागल्यामुळे त्यांची प्रतिमा खलनायिकेची बनली. खऱ्या आयुष्यातही लोक त्यांना पडद्यावरील खलनायिकेप्रमाणेच पाहू लागले. बिंदू यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, विवाहित महिलांना खरोखरच भीती वाटायची की मी त्यांच्या पतीला हडप करेन.
advertisement
7/7
एकदा त्यांच्या पतीच्या एका जवळच्या मित्राशी त्या बोलत असताना, त्या मित्राच्या पत्नीला वाटले की त्या तिच्या पतीवर डोरे टाकत आहे. २००८ मध्ये 'महबूबा' या चित्रपटात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. आज त्या आपल्या पती आणि कुटुंबासोबत मुंबईत शांत आयुष्य जगत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'बायकांचे नवरे हडपेन...' राजेश खन्नाची हिरोईन, जिला घाबरायच्या लग्न झालेल्या महिला, कोण होती ती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल