'ते रेल्वे स्टेशनवर झोपायचे', आईवडिलांचं संघर्ष आठवून भावूक झाला ललित प्रभाकर, म्हणतो 'त्यांच्या 10 टक्केही...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Lalit Prabhakar Birthday : ‘जुळून येती रेशिमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ललितने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांच्या संघर्षाबद्दल एक खूपच खास आणि भावनिक गोष्ट सांगितली आहे.
advertisement
1/7

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या ‘आरपार’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटातून तो पहिल्यांदाच निर्माता म्हणूनही काम करत आहे.
advertisement
2/7
‘जुळून येती रेशिमगाठी’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ललितने नुकतंच एका मुलाखतीत त्याच्या आई-वडिलांच्या संघर्षाबद्दल एक खूपच खास आणि भावनिक गोष्ट सांगितली आहे.
advertisement
3/7
एका मुलाखतीत ललित प्रभाकरने त्याच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींबद्दल भाष्य केलं. तो म्हणाला, “माझे आई-वडील खरं तर शेतकरी आहेत. बाबांच्या लहानपणीच माझे आजोबा गेले. तरीही त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि गावावरून मुंबईत आले.”
advertisement
4/7
ललितने पुढे एक खूपच धक्कादायक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, “एक काळ असा होता, जेव्हा त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं. ते स्टेशनवर झोपायचे. अशा परिस्थितीतही त्यांनी स्वतःचं एक वेगळं जग निर्माण केलं. लग्नानंतर त्यांनी आईला शिकवलं.”
advertisement
5/7
ललितने त्याच्या आई-वडिलांचा प्रवास खूप जवळून पाहिला आहे. तो म्हणाला, “आमचं उल्हासनगरमध्ये १ रूम किचनचं घर होतं, जिथे मोरी आणि बाथरूम एकाच ठिकाणी होती. तिथून त्यांनी बदलापूरच्या एका चाळीत घर घेतलं. त्या चाळीतून मोठ्या चाळीत, मग इमारतीत आणि आता स्वतःचं घर घेतलं आहे.”
advertisement
6/7
ललितने म्हटलं की, “त्यांनी जो संघर्ष केला आहे, त्याचं १० टक्केही मी करू शकलो नाही.” त्यांच्या या प्रवासाने त्याच्यासमोर एक असं उदाहरण ठेवलं आहे, जे तो कधीच पार करू शकत नाही, असं त्याला वाटतं.
advertisement
7/7
ललितने सांगितलं की, त्याचे आई-वडील फक्त स्वतःसाठीच जगले नाहीत, तर त्यांनी गावावरून आलेल्या अनेक लोकांना नोकरी मिळवून देण्यासाठीही मदत केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'ते रेल्वे स्टेशनवर झोपायचे', आईवडिलांचं संघर्ष आठवून भावूक झाला ललित प्रभाकर, म्हणतो 'त्यांच्या 10 टक्केही...'