TRENDING:

दारूच्या नशेत जॅकी श्रॉफने ओलांडल्या सर्व सीमा, तब्बूसोबत केलं असं कृत्य... पार्टीमध्ये झाला तुफान राडा

Last Updated:
Bollywood controversy : प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री तब्बू यांच्यामध्ये ३८ वर्षांपूर्वी असं काही घडलं होतं की, त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.
advertisement
1/6
दारूच्या नशेत जॅकी श्रॉफने ओलांडल्या सर्व सीमा, तब्बूसोबत केलं असं कृत्य...
मुंबई: बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये रोज काही ना काही घडामोडी घडतच असतात. कधी कुणामध्ये वाद होतात, तर कधी समेट. पण, १९८६ मध्ये घडलेला एक किस्सा आजही सगळ्यांना हादरवून टाकतो.
advertisement
2/6
प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री तब्बू यांच्यामध्ये ३८ वर्षांपूर्वी असं काही घडलं होतं की, त्यानंतर या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.
advertisement
3/6
१९८६ मध्ये जॅकी श्रॉफ फरहा नाजसोबत ‘दिलजले’ या चित्रपटात काम करत होता. त्यावेळी फरहा नाज एक मोठी स्टार होती. या चित्रपटाची रॅप अप पार्टी डॅनीच्या घरी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत चित्रपटातील अनेक कलाकार हजर होते. फरहा नाज तिच्या बहिणीला, म्हणजेच तब्बूला घेऊन या पार्टीत आली होती.
advertisement
4/6
पण, पार्टीत जॅकी श्रॉफने खूप जास्त दारू प्यायली आणि नशेत त्याने सगळ्या मर्यादा ओलांडल्या. तो जबरदस्तीने तब्बूला किस करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी डॅनीने मध्ये येऊन कसं तरी जॅकीला तिच्यापासून दूर केलं.
advertisement
5/6
त्या रात्रीचा गोंधळ तिथेच संपला, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा फरहा नाजने मीडियामध्ये याबद्दल आवाज उठवला, तेव्हा एकच खळबळ माजली. पण, काही काळानंतर तब्बू आणि फरहा नाजने एकत्र येऊन सांगितलं की, हा सगळा एक गैरसमज होता.
advertisement
6/6
या घटनेनंतर तब्बूने कधीही जॅकी श्रॉफसोबत कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. या घटनेने दोन्ही बहिणींच्या करिअरवरही परिणाम झाला. फरहा नाज काही चित्रपटांनंतर इंडस्ट्रीतून गायब झाली, तर तब्बूने तिचा करिअरचा प्रवास एकटीने सुरू ठेवला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दारूच्या नशेत जॅकी श्रॉफने ओलांडल्या सर्व सीमा, तब्बूसोबत केलं असं कृत्य... पार्टीमध्ये झाला तुफान राडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल