मूव्हीच नाही, खऱ्या आयुष्यातही आयुष्मान खुरानाने केलंय स्पर्म डोनेट! बदललं होतं स्वतःचं नाव, काय आहे प्रकरण?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ayushmann Khurrana Birthday : आयुष्मान खुरानाने त्याचा पहिला सिनेमा ‘विकी डोनर’ मध्ये स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती. मात्र खूप कमी लोकांना माहित असेल की त्याने खऱ्या आयुष्यातही स्पर्म डोनेट केलं आहे.
advertisement
1/6

मुंबई: बॉलिवूडमध्ये हटके आणि वेगळ्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा अभिनेता आयुष्मान खुराना नेहमीच चर्चेत असतो. आज १४ सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्याच्या आयुष्याबद्दल काही खास आणि धक्कादायक गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
2/6
आयुष्मान खुरानाचे वडील पी खुराना एक प्रसिद्ध ज्योतिषी होते. त्यांनीच आयुष्मानला नाव बदलून 'निशांत'वरून 'आयुष्मान' ठेवण्याचा सल्ला दिला होता. पण, त्यानंतर अंकशास्त्रामुळे त्याने नावामध्ये काही अतिरिक्त अक्षरं जोडली.
advertisement
3/6
आयुष्मानचे पालक खूप कडक शिस्तीचे होते. एका रिपोर्टनुसार, आयुष्मानच्या घरात एक पनिशमेंट रूम होती. जेव्हा तो काही चूक करायचा, तेव्हा त्याला तिथे मार दिला जायचा.
advertisement
4/6
२००४ मध्ये आयुष्मानने रोडीज या रिॲलिटी शोसाठी ऑडिशन दिलं होतं. त्यावेळी त्याला स्पर्म डोनेट करण्याचा टास्क देण्यात आला होता. आयुष्मानने हा टास्क फक्त पूर्णच केला नाही, तर तो शो जिंकलाही. ‘विकी डोनर’ या त्याच्या पहिल्या चित्रपटातही त्याने स्पर्म डोनरची भूमिका साकारली होती.
advertisement
5/6
आयुष्मानने पंजाबमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने पाच वर्षं थिएटर केलं. पत्रकारितेमध्ये पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्याने रेडिओ जॉकी म्हणून करिअरची सुरुवात केली.
advertisement
6/6
त्यानंतर त्याने एमटीव्हीमध्ये होस्ट म्हणून काम केलं आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्येही तो दिसला. तो उत्तम गायक आहे आणि त्याने 'विकी डोनर'मध्ये गायलेलं 'पानी दा रंग' हे गाणं खूप सुपरहिट झालं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
मूव्हीच नाही, खऱ्या आयुष्यातही आयुष्मान खुरानाने केलंय स्पर्म डोनेट! बदललं होतं स्वतःचं नाव, काय आहे प्रकरण?