TRENDING:

Plastic Chair : सगळ्या खुर्चीच्या मध्यभागी छिद्र का असतात? प्रत्येक घरात असते पण 1 टक्के लोकांनाच माहित असेल खरं कारण

Last Updated:
तुम्हाला माहितीय का की प्रत्येक प्लास्टिकच्या खुर्चीत लहान–लहान छिद्रं असतात? आणि ते फक्त डिझाइन म्हणून नाही तर त्यामागे खरंतर साइन्टिफीक कारण आहे.
advertisement
1/6
सगळ्या खुर्चीच्या मध्यभागी छिद्र का असतात? 1 टक्के लोकांनाच माहित असेल खरं कारण
प्लास्टिकच्या खुर्च्या जवळ-जवळ बहुतांश घरांमध्ये दिसतात. कुठेही बसण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी खुर्ची म्हणजे प्लास्टिकची. या खुर्च्या हलक्या, टिकाऊ आणि किफायतशीर असल्यामुळे प्रत्येक घरात सहज आढळतात. या खुर्च्या आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग असल्यामुळे आपण त्याकडे एवढं लक्ष देऊ पाहत नाही. त्यामुळे त्यात असलेले काही फीचर्स देखील आपल्याला कळत नाही किंवा माहित पडत नाहीत.
advertisement
2/6
पण तुम्हाला माहितीय का की प्रत्येक प्लास्टिकच्या खुर्चीत लहान–लहान छिद्रं असतात? आणि ते फक्त डिझाइन म्हणून नाही तर त्यामागे खरंतर साइन्टिफीक कारण आहे.
advertisement
3/6
सर्वात पहिले कारण म्हणजे स्टॅकिंग (एकावर एक खुर्च्या ठेवणे). जर खुर्च्यांमध्ये छिद्रं नसती, तर एकमेकांवर ठेवताना खुर्च्यांच्या मध्ये हवा अडकून बसली असती आणि त्या एकमेकांना चिकटल्या गेल्या असत्या किंवा एकमेकांमध्ये लगेच अडकल्या गेल्या नसत्या. पण या छिद्रांमुळे हवा सहज बाहेर निघते आणि खुर्च्या एकमेकांवर सहज ठेवता किंवा काढता येतात.
advertisement
4/6
दुसरं कारण म्हणजे उत्पादन प्रक्रिया. प्लास्टिकच्या खुर्च्या गरम प्लास्टिकला साच्यात (मोल्डमध्ये) ओतून तयार केल्या जातात. या वेळी छिद्रं असल्यामुळे खुर्ची साच्यातून सहज बाहेर निघते आणि तुटण्याचा धोका कमी होतो. यामुळे खुर्ची हलकी होते आणि कमी प्लास्टिक लागल्यामुळे उत्पादन खर्चही कमी होतो.
advertisement
5/6
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सोयीसुविधा. खुर्चीच्या पाठीमागे असलेली छिद्रं हवेचा प्रवाह टिकवून ठेवतात, ज्यामुळे त्यावर बसणाऱ्याला घाम कमी येतो आणि आरामदायी वाटतं. त्याचप्रमाणे, जर खुर्चीवर पाणी सांडलं तर ते लगेच या छिद्रांमधून खाली वाहून जातं आणि खुर्चीवर पाणी साठत नाही.
advertisement
6/6
थोडक्यात सांगायचं तर, ही साधी वाटणारी छिद्रं खुर्ची हलकी, टिकाऊ, सोयीस्कर आणि उत्पादनात स्वस्त बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतात. त्यामुळे आता पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्लास्टिकच्या खुर्चीत बसाल, तेव्हा या छोट्या छिद्रांमागचं मोठं कारण तुम्हाला नक्की आठवेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Plastic Chair : सगळ्या खुर्चीच्या मध्यभागी छिद्र का असतात? प्रत्येक घरात असते पण 1 टक्के लोकांनाच माहित असेल खरं कारण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल