गाल आत गेले, वजनही घटलं, 52 वर्षीय करण जोहरची झालीय वाईट अवस्था, VIRAL VIDEO ने वाढवली चिंता
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
करण जोहर पुन्हा एकदा त्याच्या कमी झालेल्या वजनामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
1/8

करण जोहर हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय पण तितकाच वादग्रस्त फिल्ममेकर आहे. आजवर त्याने अनेक हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याच्यावर नेपोटिझमचा आरोप केला जात आहे.
advertisement
2/8
करण त्याच्या चित्रपटांइतकाच त्याच्या स्टाइल स्टेटमेंटमुळेही तितकाच लोकप्रिय आहे. फॅशनच्या बाबतीत तो अनेक हिरोंना टक्कर देतो. त्याने फॅशन आयकॉन म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
3/8
नुकतंच करण जोहर मुंबईतील एका फॅशन शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने रॅम्प वॉकही केला. या वॉकसाठी त्याने जो लूक केला होता तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
advertisement
4/8
यावेळी त्याने ऑल व्हाइट लूक कॅरी केला होता. त्याने पांढऱ्या रंगाचा शर्ट, पॅन्ट आणि त्यावर लांब जॅकेट घातला होता. गळ्यात एक कुंदन नेकलेस घालून त्याने त्याचा लूक पूर्ण केला होता.
advertisement
5/8
रॅम्प वॉकच्या वेळी करण जोहरचा आत्मविश्वास पाहण्यासारखा होता. त्याच्या वॉकचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. यावेळी करण जोहरसोबत अनेक सेलिब्रिटींनी रॅम्प वॉक केला.
advertisement
6/8
सिद्धार्थ मल्होत्रा, अर्जुन कपूर, मलायका अरोरा इत्यादी कलाकार या इव्हेंटला हजर होते. दरम्यान यावेळी करण जोहरच्या कमी झालेल्या वजनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
advertisement
7/8
जोहर पुन्हा एकदा त्याच्या कमी झालेल्या वजनामुळे चर्चेत आला आहे. त्याचा व्हिडिओ ऑनलाइन होताच, काही नेटकऱ्यांनी त्याचे अचानक वजन कमी झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. "करणला काय झालं? तो इतका कमजोर का झाला आहे?" एका नेटिझन म्हणाला.
advertisement
8/8
एका वापरकर्त्याने लिहिले, "करणसोबत काय झाले आहे... तो 'कॅस्ट अवे'च्या रिमेकमध्ये स्वतःला कास्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे का?" "'टॉम हँक्स'" एका वापरकर्त्याने लिहिले. "ओझेम्पिकचा परिणाम! तो म्हातारा दिसतोय," दुसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली. "अरे काय झाले करणला? तो इतका त्रासलेला दिसतोय," आणखी एका नेटिझनने लिहिले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
गाल आत गेले, वजनही घटलं, 52 वर्षीय करण जोहरची झालीय वाईट अवस्था, VIRAL VIDEO ने वाढवली चिंता