TRENDING:

पुन्हा एकदा बॉलिवूड Vs साऊथ? दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्टला मोठा झटका! साऊथच्या मोठ्या प्रोजेक्टमधून पत्ता कट

Last Updated:
दीपिका पाठोपाठ आता आलिया भट्टलाही एका मोठ्या साऊथ चित्रपटातून बाहेर काढल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे आलियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/8
दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्टला मोठा झटका,साऊथच्या मोठ्या प्रोजेक्टमधून पत्ता कट
मुंबई: बॉलिवूडमध्ये सध्या अभिनेत्रींच्या कामकाजाच्या पद्धतीवरून आणि मागण्यांवरून साऊथच्या दिग्दर्शकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. दीपिका पदुकोणने ‘स्पिरिट’ आणि ‘कल्कि २’ मधून माघार घेतल्यामुळे आधीच वातावरण तापलं असताना, आता बॉलिवूड फॅन्ससाठी आणखी एक शॉकिंग बातमी समोर आली आहे.
advertisement
2/8
दीपिका पाठोपाठ आता आलिया भट्टलाही एका मोठ्या साऊथ चित्रपटातून बाहेर काढल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे आलियाच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ही फिल्म आता साऊथच्या बड्या अभिनेत्रीकडे जाण्याची शक्यता आहे.
advertisement
3/8
माहितीनुसार, गेल्या नोव्हेंबरपासून आलिया भट्ट आणि फिल्ममेकर नाग अश्विन यांची एका महिला-केंद्रित चित्रपटासाठी बोलणी सुरू होती. परंतु, ११ महिन्यांच्या प्रदीर्घ काळात गोष्टी पूर्णपणे बदलल्या.
advertisement
4/8
‘कल्कि २’ मधून दीपिका बाहेर पडल्यानंतर नाग अश्विनने आता आपले लक्ष या महिला-केंद्रित प्रोजेक्टवर केंद्रित करायचं ठरवलं आहे.
advertisement
5/8
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता आलियाऐवजी अभिनेत्री साई पल्लवीशी चर्चा सुरू केली आहे. साई पल्लवी ही खरंतर या अॅक्शन-ड्रामा चित्रपटासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती होती.
advertisement
6/8
आलियाने नुकतंच मॅडॉक फिल्म्सच्या ‘चामुंडा’ चित्रपटासाठी मार्च २०२६ च्या मोठ्या प्रमाणात डेट्स दिल्या आहेत. यामुळे नाग अश्विनच्या प्रोजेक्टसाठी तिच्या डेट्सचा प्रश्न निर्माण झाला असावा.
advertisement
7/8
दुसरीकडे, साई पल्लवीच्या सर्व डेट्स सध्या नितेश तिवारीच्या बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटासाठी बुक आहेत. ‘रामायणाचे’ दोन्ही भाग पूर्ण झाल्यानंतरच ती नाग अश्विनला वेळ देऊ शकेल.
advertisement
8/8
२०२६ च्या मध्यापर्यंत ‘रामायणाचा’ दुसरा भाग पूर्ण होण्याची शक्यता आहे. जर डेट्स जुळल्या, तर नाग अश्विन ‘कल्कि २’ सुरू करण्यापूर्वी साई पल्लवीसोबत हा महत्त्वाचा चित्रपट पूर्ण करू शकतील. यामुळे साऊथमध्ये आलियाच्या व्यावसायिक निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पुन्हा एकदा बॉलिवूड Vs साऊथ? दीपिका पादुकोणनंतर आलिया भट्टला मोठा झटका! साऊथच्या मोठ्या प्रोजेक्टमधून पत्ता कट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल