TRENDING:

Dhanush-Mrunal Thakur : धनुष-मृणाल ठाकूरचं जमलं! कशी सुरू झाली लव्हस्टोरी? जवळच्या मित्राने सगळंच सांगितलं...

Last Updated:
Dhanush Mrunal Thakur Dating : धनुष आणि मृणाल ठाकूर यांच्या डेटिंगच्या चर्चांना जोरदार उधाण आले आहे. व्हायरल व्हिडिओमुळे या चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
1/7
धनुष-मृणालचं जमलं, कशी सुरू झाली लव्हस्टोरी? जवळच्या मित्राने सगळंच सांगितलं
मुंबई: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. हे चेहरे आहेत प्रसिद्ध अभिनेते धनुष आणि अभिनेत्री मृणाल ठाकूर. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर त्यांच्या डेटिंगची जोरदार चर्चा सुरू आहे.
advertisement
2/7
त्यांच्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओने तर या चर्चांना आणखी बळ दिलं आहे. या व्हिडिओमध्ये धनुष आणि मृणाल खूपच जवळ आणि एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसले आहेत. जो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यात धनुषने मृणालचा हात धरला आहे.
advertisement
3/7
दोघेही एकमेकांशी काहीतरी बोलत आहेत, आणि मृणाल धनुषच्या कानात काहीतरी सांगताना दिसतेय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लगेचच 'धनुष आणि मृणाल डेट करत आहेत का?' असे प्रश्न नेटकऱ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे.
advertisement
4/7
या सगळ्या चर्चांमध्ये एका सूत्राने त्यांच्या नात्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. 'न्यूज १८ शोशा'ने दिलेल्या माहितीनुसार, धनुष आणि मृणाल ठाकूर एकमेकांना डेट करत आहेत. त्यांचं नातं अजून नवीन आहे, पण ते दोघेही त्यांचे नाते लपवण्याचा प्रयत्न करत नाहीत.
advertisement
5/7
सूत्रांनी पुढे असंही सांगितलं आहे की, 'हे दोघे अनेकदा एकत्र बाहेर जातात आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींचाही त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. कारण त्या दोघांचे विचार, आवडी-निवडी आणि निर्णय खूप मिळतेजुळते आहेत.'
advertisement
6/7
धनुष आणि मृणालची पहिली भेट कशी झाली, याबद्दलही सूत्रांनी माहिती दिली आहे. 'सीता रामम' या चित्रपटाच्या यशानंतर मृणालला दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक संधी मिळू लागल्या. त्याचवेळी ती मुंबई आणि हैदराबादमध्ये चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रवास करत होती, आणि याच दरम्यान दाक्षिणेकडील एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली.
advertisement
7/7
या भेटीनंतर त्यांच्यात मैत्री झाली, आणि नंतर या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं, असं म्हटलं जातं. अलीकडेच काजोलच्या 'मा' या चित्रपटाच्या प्रीमियरलाही ते दोघे एकत्र दिसले होते. तसेच, अजय देवगणसोबतच्या 'सन ऑफ सरदार २' च्या स्क्रिनिंगसाठी पाहुण्यांच्या यादीत धनुषचं नाव होतं, त्यामुळेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhanush-Mrunal Thakur : धनुष-मृणाल ठाकूरचं जमलं! कशी सुरू झाली लव्हस्टोरी? जवळच्या मित्राने सगळंच सांगितलं...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल