परवडणारही नाही! 400 साड्या, पण आवडती फक्त एक! गिरिजा ओकच्या कलेक्शनमधील सर्वांत महागडी साडी कितीची माहितीए?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak Expensive Saree Collection: 'नॅशनल क्रश' गिरिजा ओक-गोडबोलेच्या साड्यांच्या खास कलेक्शनची चर्चा महिला वर्गात सुरू झाली आहे. गिरिजाकडे १००-२०० नव्हे, तर तब्बल ४०० साड्यांचा खजिना आहे, ज्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.
advertisement
1/9

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री गिरिजा ओक-गोडबोले तिच्या साडीतील साधेपणा आणि मोहक लुकमुळे रातोरात 'नॅशनल क्रश' बनली. तिच्या निळ्या साडीतील एका मुलाखतीमुळे तिचे चाहते वाढले आहेत.
advertisement
2/9
आता तिच्या साड्यांच्या खास कलेक्शनची चर्चा महिला वर्गात सुरू झाली आहे. गिरिजाकडे १००-२०० नव्हे, तर तब्बल ४०० साड्यांचा खजिना आहे, ज्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.
advertisement
3/9
गिरिजाने नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या साडीच्या प्रेमाबद्दल आणि कलेक्शनबद्दल अनेक गुपिते उघड केली आहेत. गिरिजा म्हणाली, "माझ्याकडे ४०० साड्यांचा मोठा संग्रह आहे. यातील बऱ्याच साड्या मला माझ्या आई आणि आजीकडून वारसा म्हणून मिळाल्या आहेत."
advertisement
4/9
तिच्याकडे देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील, वेगवेगळ्या परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेली साडी आहे. तिच्या कलेक्शनमध्ये काही साड्या ५० ते ७० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. तिने आपल्या आजीची ६०-७० वर्षांपूर्वीची, हाताने रंगवलेली क्रीम रंगाची शिफॉन साडीही दाखवली.
advertisement
5/9
गिरिजाच्या साड्यांच्या किमती ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. तिने एका खास बनारसी साडीबद्दल बोलताना केलेला खुलासा खूपच सनसनाटी आहे!
advertisement
6/9
गिरिजाने आपली आवडती 'रॉ मँगो' बनारसी जमावर साडी दाखवली आणि म्हणाली, "ही माझी खूप आवडती साडी आहे, पण थोडी महाग आहे. याची किंमत लाखोंमध्ये आहे."
advertisement
7/9
पुढे तिने सांगितले की, "काही साड्यांची किंमत किडनीच्या किमतीइतकी आहे." अशा महागड्या साड्या घेणं आता मला परवडणारे नाही, असेही तिने स्पष्ट केले.
advertisement
8/9
गिरिजाच्या मते, साड्यांची योग्य काळजी घेतल्यास त्या वर्षानुवर्षे चांगल्या टिकतात. तिच्या कलेक्शनमध्ये लेहेरिया, ब्लॉक-प्रिंटेड, कलमकारी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पैठणी साड्यांचाही समावेश आहे.
advertisement
9/9
गुजरातहून खरेदी केलेली तिची एक जॉर्जेट लेहेरिया साडी तर एका लहान बॉक्समध्ये मावते. तिने स्वतः ब्लॉक प्रिंट केलेली साडीसुद्धा दाखवली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
परवडणारही नाही! 400 साड्या, पण आवडती फक्त एक! गिरिजा ओकच्या कलेक्शनमधील सर्वांत महागडी साडी कितीची माहितीए?