6 डायरेक्टर्स, 26 स्टार, तरीही फ्लॉप ठरला सिनेमा; बॉलिवूडच्या इतिहासातील डिझास्टर फिल्म, नाना पाटेकरांनी केलेलं काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood Biggest Disaster: तब्बल अठरा वर्षांपूर्वी एक असा चित्रपट आला होता, ज्याला एक-दोन नव्हे तर सहा दिग्दर्शकांनी मिळून बनवले होते आणि त्यात तब्बल २६ मोठे स्टार्स होते. यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला.
advertisement
1/8

मुंबई: बॉलिवूडमध्ये एका चित्रपटाचे दिग्दर्शन एकाच व्यक्तीने करण्याची पद्धत आहे, पण तुम्हाला माहित आहे का? तब्बल अठरा वर्षांपूर्वी एक असा चित्रपट आला होता, ज्याला एक-दोन नव्हे तर सहा दिग्दर्शकांनी मिळून बनवले होते आणि त्यात तब्बल २६ मोठे स्टार्स होते. यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आपटला आणि एक मोठा डिझास्टर ठरला.
advertisement
2/8
२००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव आहे 'दस कहानियाँ'. ही फिल्म म्हणजे दहा वेगवेगळ्या, पण थ्रिलर कथांचा संग्रह होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता, मेघना गुलजार, रोहित रॉय, संजय गुप्ता, अपूर्वा लखिया आणि जस्मीत ढोढी या सहा नामवंत दिग्दर्शकांनी केले होते.
advertisement
3/8
तीन तासांच्या या चित्रपटात क्राईम-थ्रिलर, वासना, धोका आणि रोमान्स अशा अनेक डार्क थीम्स पाहायला मिळाल्या. या चित्रपटात २६ हून अधिक कलाकार होते. यात संजय दत्त, सुनील शेट्टी, नाना पाटेकर, नसीरुद्दीन शाह, मनोज बाजपेयी, अरबाज खान, जिमी शेरगिल, अमृता सिंह आणि अनुपम खेर यांसारखे दिग्गज अभिनेते होते. इतकेच नाही तर दीया मिर्झा, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर आणि शबाना आझमी यांचाही समावेश होता.
advertisement
4/8
'दस कहानियाँ' मधील प्रत्येक कथा वेगळी आहे. त्यातील 'मॅट्रिमॉनी' नावाची पहिली कथा अत्यंत रोमांचक आहे. या कथेत एका कंपनीच्या सीईओची पत्नी एका आर्मी ऑफिसरसोबत प्रेमसंबंध ठेवते. तो तिला एक डायमंड नेकलेस भेट देतो.
advertisement
5/8
पत्नी तो नेकलेस घेण्यास नकार देते आणि नंतर एक शक्कल लढवते. ती तो नेकलेस ज्वेलरी शॉपमध्ये परत करते आणि त्याबदल्यात एक लकी ड्रॉ कूपन घेते, जे ती आपल्या पतीच्या नावावर काढते.
advertisement
6/8
लकी ड्रॉ तिच्या पतीच्या नावावर निघतो, पण शेवटी तिला कळते की तो नेकलेस तिच्या पतीच्या सेक्रेटरीकडे आहे. म्हणजेच, तिच्या पतीचेच तिच्या सेक्रेटरीसोबत अफेअर सुरू आहे.
advertisement
7/8
दुसरी कथा 'हाय ऑन हायवे' एका कॉलेज कपलची आहे. हे कपल एका रात्री ड्राइव्हवर असताना त्यांना गुंड भेटतात. गुंड मुलीचे अपहरण करतात, पण मुलगा तिला वाचवू शकत नाही. पोलिसांनी मुलीला वाचवल्यानंतरही, आपली मैत्रीण गुंडांपासून वाचवता न आल्याच्या अपराधी भावनेतून मुलगा आपल्या हाताची नस कापून आत्महत्या करतो.
advertisement
8/8
त्याचप्रमाणे, "दस कहानियां" मध्ये "स्ट्रेंजर्स इन द नाईट," "झहीर," "लव्हडेल," "सेक्स ऑन द बीच," "राईस प्लेट," "गब्बलून," आणि "राईज अँड फॉल" सारख्या कथांचा समावेश आहे. बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच चित्रपटावर अनेक दिग्दर्शकांनी काम केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
6 डायरेक्टर्स, 26 स्टार, तरीही फ्लॉप ठरला सिनेमा; बॉलिवूडच्या इतिहासातील डिझास्टर फिल्म, नाना पाटेकरांनी केलेलं काम