TRENDING:

2700 रुपयांची आय क्रीम, 2400 चं टोनर; दीपिका पादुकोणच्या ब्यूटी प्रोडक्ट्सचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल

Last Updated:
Deepika Padukone Beauty Brand 82°E : दीपिकाने २०२१ मध्ये स्किनकेअर ब्रँड 82°E ची सह-स्थापना केली. मात्र, या ब्रँडच्या उत्पादनांच्या किमती ऐकून सामान्य ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळणार आहे.
advertisement
1/8
दीपिका पादुकोणच्या ब्यूटी प्रोडक्ट्सचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल
मुंबई: बॉलिवूडची टॉप अभिनेत्री दीपिका पादुकोण केवळ पडद्यावरच नाही, तर बिझनेसच्या जगातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. अभिनयाच्या पलीकडे जात, दीपिकाने २०२१ मध्ये स्किनकेअर ब्रँड 82°E ची सह-स्थापना केली, जो २०२२ च्या अखेरीस अधिकृतपणे लॉन्च झाला.
advertisement
2/8
हा ब्रँड आधुनिक सायन्स आणि भारतीय पारंपारिक वेलनेस प्रक्रियेचा संगम साधतो. मात्र, या ब्रँडच्या उत्पादनांच्या किमती ऐकून सामान्य ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळणार आहे.
advertisement
3/8
दीपिकाचा 82°E ब्रँड स्वतःला प्रीमियम लक्झरी उत्पादन म्हणून सादर करतो. ब्रँडच्या वेबसाइटनुसार, त्यांच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या उत्पादनांची किंमत १००० ते ३००० रुपयांच्या दरम्यान आहे.
advertisement
4/8
यातील काही प्रमुख आणि महागड्या उत्पादनांचे दर म्हणजे, ५० मिली सँडलनट मॉइश्चरायझर २७०० रुपये, ३० मिली बकुचिओल फेस ऑइल २९०० रुपये, १०० मिली गोटू कोला टोनर २४०० रुपये, १५ ग्रॅम गुलाब अंडर-आय क्रीम २४०० रुपये, १०० मिली कोकम क्लींझर ट्यूब १२०० रुपये असे आहेत.
advertisement
5/8
दीपिका पादुकोणचा हा ब्रँड लाँच करण्याचा निर्णय, सध्याच्या सेलिब्रिटींचा बदललेला बिझनेस माईंडसेट दर्शवतो. आजकालचे कलाकार केवळ जाहिराती करण्याऐवजी, स्वतःच्या कंपन्यांचे मालक बनत आहेत आणि दीर्घकाळ चालणारे व्यवसाय उभे करत आहेत.
advertisement
6/8
ब्रँड लॉन्च करताना दीपिका म्हणाली होती, "जगात कुठेही असले तरी, सेल्फ-केअरच्या साध्या सवयी मला लक्ष केंद्रित करण्यास मदत करतात. 82°E सोबत, मी तुम्हा सर्वांना स्वतःच्या मूळ रूपाशी जोडण्यासाठी प्रेरित करू इच्छिते."
advertisement
7/8
दीपिकाने सांगितले होते की, ही स्किनकेअर उत्पादने खूप मेहनत घेऊन आणि काळजीपूर्वक तयार केली आहेत. ती म्हणाली, "आमच्या स्किनकेअर उत्पादनांची ही मालिका क्लिनीकली टेस्ट करून बनवली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी साध्या आणि प्रभावी पद्धतीने घेऊ शकाल."
advertisement
8/8
82°E च्या उत्पादनांच्या प्रीमियम दरावरून हे स्पष्ट होते की, दीपिका पादुकोणने आपल्या ब्रँडची जागा उच्चभ्रू वर्गासाठी निश्चित केली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
2700 रुपयांची आय क्रीम, 2400 चं टोनर; दीपिका पादुकोणच्या ब्यूटी प्रोडक्ट्सचे दर पाहून तोंडचं पाणी पळेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल