TRENDING:

'तिने कर्कटकने स्वतःच्या छातीवर...' प्रसिद्ध अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडने प्रेमात केला भयंकर प्रकार, ऐकून अंगावर काटा येईल

Last Updated:
ज्या अभिनेत्यावर लाखो मुली जीव ओवाळून टाकतात, त्याला मात्र एका मुलीच्या अतिवेडेपणामुळे चक्क ब्रेकअप करून पळ काढावा लागला होता. त्याने आपल्या एका एक्स गर्लफ्रेंडला चक्क सायको म्हटलं होतं.
advertisement
1/9
प्रसिद्ध अभिनेत्याच्या Ex GF ने प्रेमात केला भयंकर प्रकार, ऐकून अंगावर काटा येईल
हिंदी टेलिव्हिजन विश्वातला 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' आणि तरुणींचा फेव्हरेट असलेला अभिनेता पार्थ समथान सध्या आपल्या प्रोफेशनल लाइफमुळे नाही, तर एका जुन्या आणि तितक्याच हादरवून टाकणाऱ्या खुलाशामुळे चर्चेत आला आहे.
advertisement
2/9
ज्या पार्थवर लाखो मुली जीव ओवाळून टाकतात, त्या पार्थला मात्र एका मुलीच्या अतिवेडेपणामुळे चक्क ब्रेकअप करून पळ काढावा लागला होता. त्याने आपल्या एका एक्स गर्लफ्रेंडला चक्क सायको म्हटलं होतं.
advertisement
3/9
पार्थने एका मुलाखतीत त्याच्या शालेय जीवनातील एक धक्कादायक आठवण सांगितली. तो म्हणाला की, शाळेत असताना तो अनेक मुलींचा क्रश होता. अशातच एका मुलीसोबत त्याचं सूत जुळलं. पण तिचं प्रेम हे प्रेमापेक्षा वेड जास्त होतं.
advertisement
4/9
पार्थने सांगितलं, "एके दिवशी तिने हद्दच पार केली. तिने चक्क कंपासमधील कर्कटकने आपल्या छातीवर माझं नाव कोरलं! तिची ती अवस्था आणि ते रक्त पाहून मी अक्षरशः हादरलो होतो. मला तेव्हाच जाणवलं की ही मुलगी सामान्य नाही, तर सायको आहे."
advertisement
5/9
या प्रकारानंतर पार्थ इतका घाबरला की त्याने तिला समजावून सांगून तिच्याशी असलेले सर्व संबंध कायमचे तोडून टाकले. मनोरुग्ण लोकच अशा प्रकारचं टोकाचं पाऊल उचलू शकतात, असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.
advertisement
6/9
आपला अनुभव सांगताना पार्थने चाहत्यांनाही मोलाचा सल्ला दिला. तो म्हणाला, "प्रेम हे एकमेकांचा आदर करण्यासाठी असतं, अशा प्रकारचे जीवघेणे स्टंट करण्यासाठी नाही. कोणाच्याही प्रेमात इतकं वेडं होऊ नका की तुम्ही स्वतःला इजा करून घ्याल. अशा सायको गिरीला मी प्रेम मानत नाही."
advertisement
7/9
पार्थचं नाव मध्यंतरी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी हिच्याशीही जोडलं गेलं होतं, पण त्या चर्चा नंतर हवेत विरून गेल्या.
advertisement
8/9
पार्थबद्दलची दुसरी एक रंजक गोष्ट म्हणजे, अनेकांना तो उत्तर भारतीय वाटतो. पण एका अलीकडच्या मुलाखतीत त्याने यावरचा पडदा उचलला. तो अभिमानाने म्हणाला, "लोकांचा मोठा गैरसमज आहे की मी नॉर्थ इंडियन आहे. पण मी मूळचा पुण्याचा असून एक अस्सल मराठी मुलगा आहे."
advertisement
9/9
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, पार्थ सध्या एका हिंदी मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहे. काही काळापूर्वी तो भारतातील सर्वात लोकप्रिय शो सीआयडी मध्येही दिसला होता. तिथे त्याने काही भागांसाठी 'एसीपी'ची भूमिका साकारली होती, जिला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'तिने कर्कटकने स्वतःच्या छातीवर...' प्रसिद्ध अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडने प्रेमात केला भयंकर प्रकार, ऐकून अंगावर काटा येईल
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल