जगभरात हाहाकार! अमेरिकेत हिमवादळ, भारत, रशियासह युरोपात का पडतोय इतका जीवघेणा बर्फ?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रशिया आणि अमेरिका भीषण बर्फवृष्टीने त्रस्त आहेत. स्ट्रॅटोस्फेरिक पोलर व्होर्टेक्समुळे ग्लोबल वॉर्मिंगने वादळे अधिक विनाशकारी झाली आहेत, शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे.
advertisement
1/8

जगभरात सध्या हाहाकार माजला आहे. कुठे मजल्यांपर्यंत बर्फ साठलेला आहे तर कुठे लोक गाड्यांमध्येच अडकलेले आहेत. काही ठिकाणी तर शहरच्या शहर बर्फाखाली जात असल्याचं समोर आलं आहे. इतकी भयंकर परिस्थिती का आणि कशामुळे निर्माण झाली आहे. इतका बर्फ अचानक कसा पडायला लागला? यामागे नेमकं कारण काय?
advertisement
2/8
जगभरातील विकसित देशांना सध्या निसर्गाच्या भीषण कोपाचा सामना करावा लागत आहे. रशियात ४ मजले उंच बर्फ साचला असून अमेरिकेत बर्फील्या वादळाने हजारो घरांची वीज गुल केली आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, हे केवळ थंडीचे वादळ नसून पृथ्वीच्या वातावरणात ३२ किलोमीटर उंचीवर घडणाऱ्या एका मोठ्या बदलाचा परिणाम आहे, ज्याला स्ट्रॅटोस्फेरिक पोलर व्होर्टेक्स.
advertisement
3/8
हे हे उत्तर ध्रुवाच्या (North Pole) वर आकाशात घिरट्या घालणारं एक थंड हवेचं अक्राळविक्राळ चक्र आहे. सोप्या उदाहरणासह समजून घ्यायचं तर कल्पना करा तुमच्या घरात एक मोठा फ्रीजर आहे आणि त्याचं दार पूर्णपणे उघडं आहे. पण त्या फ्रीजरच्या दारासमोर तुम्ही एक अतिशय वेगवान पंखा लावला आहे.
advertisement
4/8
जोपर्यंत तो पंखा जोरात फिरतोय, तोपर्यंत तो फ्रीजरमधील थंड हवा बाहेर येऊ देत नाही, ती हवा तिथेच गोल-गोल फिरत राहते. याला म्हणतात 'स्ट्राँग व्होर्टेक्स'. यामुळे बाहेरच्या भागात हवामान सामान्य राहतं.
advertisement
5/8
पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर अतिशय थंड हवेचा एक पट्टा असतो, ज्याला जेट स्ट्रीम रोखून धरते. मात्र, वाढत्या जागतिक तापमानामुळे ही जेट स्ट्रीम आता कमकुवत आणि वेडीवाकडी झाली आहे. शास्त्रज्ञ याला ओपन डोअर्स फीडबॅक म्हणतात. म्हणजे जसं फ्रीजचं दार उघडं सोडल्यावर आतील थंडी बाहेर पसरते, तशीच आर्क्टिकमधील गोठवणारी हवा आता दक्षिणेकडे अमेरिका आणि युरोपमध्ये शिरली आहे.
advertisement
6/8
हे ऐकायला विचित्र वाटेल, पण पृथ्वी गरम होत असल्यामुळेच हे वादळ अधिक शक्तिशाली झाले आहे: समुद्र गरम झाल्यामुळे वातावरणात आर्द्रता वाढली आहे. हवेतील ही ओलावायुक्त उष्णता वादळांना प्रचंड ऊर्जा पुरवते. यामुळे जिथे आधी फक्त पाऊस पडायचा, तिथे आता भीषण बर्फवृष्टी किंवा बर्फीला पाऊस पडत आहे.
advertisement
7/8
वातावरणाच्या खालच्या थरातील (ट्रोपोस्फिअर) उष्ण हवा जेव्हा वरच्या थरातील पोलर व्होर्टेक्सला जाऊन धडकते, तेव्हा ऊर्जेचा एक मोठा स्फोट होतो. ही ऊर्जा पुन्हा खाली जमिनीच्या दिशेने येते आणि अमेरिकेसारख्या देशांत जीवघेणी थंडी निर्माण करते. मेक्सिकोच्या खाडीतील अतिउष्ण हवा आणि उत्तरेकडील गोठवणारी हवा यांच्या टकरीमुळे हे वादळ अधिक हिंसक बनले आहे.
advertisement
8/8
शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, जरी एकूण बर्फवृष्टीचे प्रमाण कमी होत असले, तरी जेव्हा जेव्हा अशी वादळं येतील, ती पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त विनाशकारी असतील. ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणातील असमतोल वाढल्याने 'अनपेक्षित' हवामानाचा धोका आता वाढला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/विदेश/
जगभरात हाहाकार! अमेरिकेत हिमवादळ, भारत, रशियासह युरोपात का पडतोय इतका जीवघेणा बर्फ?