पहिल्या नवऱ्याने जीव जाईपर्यंत मारलं, दुसऱ्याचा मृत्यू; 59 वर्षी तिसरं लग्न करूनही अभिनेत्रीला मिळालं नाही सुख, पतीवरच केले शोषणाचे आरोप
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Guess Who: जिने आपल्या ग्लॅमरने आणि बोल्डनेसने संपूर्ण देशाला वेड लावलं, पण खऱ्या आयुष्यात मात्र या अभिनेत्रीला अतिशय वेदनादायी प्रसंगांना सामोरं जावं लागलं.
advertisement
1/8

बॉलिवूड बाहेरून जितकं ग्लॅमरस आणि चकाकणारं दिसतं, त्याच्या अगदी उलट या इंडस्ट्रीतील कलाकारांचं आयुष्य असतं. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने आपल्या ग्लॅमरने आणि बोल्डनेसने संपूर्ण देशाला वेड लावलं. पण खऱ्या आयुष्यात मात्र या अभिनेत्रीला अतिशय वेदनादायी प्रसंगांना सामोरं जावं लागलं.
advertisement
2/8
ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून ७०-८० च्या दशकात सिल्व्हर स्क्रीनला वेगळंच ग्लॅमर मिळवून देणाऱ्या झीनत अमान. झीनत अमान यांना सौंदर्याची खाण म्हटलं जायचं, मात्र वैयक्तिक आयुष्यात त्यांनी खूप दुःख भोगलं. एक-दोन नाही, तर तीन लग्न करूनही त्यांना आयुष्यातील खरं प्रेम मिळालं नाही.
advertisement
3/8
१९७८ साली झीनत अमान एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या. 'अब्दुल्ला' सिनेमाच्या सेटवर त्यांची ओळख संजय खान यांच्याशी झाली. दोन मुलांचे बाप असतानाही झीनत त्यांच्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी गुपचूप लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय झीनत यांच्या अंगाशी आला.
advertisement
4/8
झीनत यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. संशयाने पछाडलेल्या संजय खानने एकदा हॉटेलच्या लॉबीत झीनत यांना इतकं बेदम मारलं की, त्यांचा जबडा तुटला आणि त्यांच्या एका डोळ्याला कायमची इजा झाली. एका वर्षातच या भयानक नात्याचा अंत घटस्फोटाने झाला.
advertisement
5/8
पहिल्या लग्नातील दुःखद आठवणी विसरून १९८५ साली झीनत यांनी मजहर खान यांच्याशी लग्न केलं. झीनत यांना आई व्हायचं होतं आणि त्यांना दोन मुलंही झाली. पण पत्नीचं यश मजहर यांना पचवणं कठीण जात होतं.
advertisement
6/8
अखेर लग्नाच्या १२ वर्षांनी त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पण त्यापूर्वीच १९९८ मध्ये मजहर यांचा मृत्यू झाला. दुर्दैव असं की, पतीच्या अंत्यसंस्काराला गेलेल्या झीनत यांना सासरच्या लोकांनी घरातही घेऊ दिलं नाही आणि पतीचं अंतिम दर्शनही घेऊ दिलं नाही.
advertisement
7/8
दोन लग्नात आलेल्या अपयशामुळे झीनत पूर्णपणे खचल्या होत्या. अशातच २०१२ साली त्यांनी ५९ व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ३३ वर्षीय अमन खन्ना उर्फ सर्फराज याच्याशी तिसरं लग्न केलं. पण या लग्नातही त्यांना सुख मिळालं नाही. उलट ही त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक ठरली.
advertisement
8/8
लग्नाच्या काही दिवसांतच झीनत यांनी सर्फराजवर बलात्कार, फसवणूक आणि पाठलाग केल्याचे गंभीर आरोप केले. झीनत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सर्फराजला अटक केली आणि झीनत यांच्या या लग्नाचाही भयानक अंत झाला.<span style="font-size: 20px;"> </span><span style="font-size: 20px;"> </span>
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पहिल्या नवऱ्याने जीव जाईपर्यंत मारलं, दुसऱ्याचा मृत्यू; 59 वर्षी तिसरं लग्न करूनही अभिनेत्रीला मिळालं नाही सुख, पतीवरच केले शोषणाचे आरोप