TRENDING:

Suspense Thriller Movie: 2024 चा सुपरहिट सिनेमा, सस्पेन्स असा की डोकं चक्रावेल; बॉक्स ऑफिसवर दणकून केली कमाई!

Last Updated:
2024 साली अनेक हिट सिनेमे आले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई केली. अशाच एका सस्पेंस थ्रिलर सिनेमाविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/7
2024 चा सुपरहिट सिनेमा, सस्पेन्स असा की डोकं चक्रावेल; बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई!
2024 साली अनेक हिट सिनेमे आले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर दणकून कमाई केली. अशाच एका सस्पेंस थ्रिलर सिनेमाविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/7
आपण ज्या सिनेमाविषयी बोलत आहोत तो आहे मल्याळम हिट सिनेमा 'अब्राहम ओझलर' ज्याने प्रेक्षकांचं डोकं अक्षरशः चक्रावून सोडलं. 'अब्राहम ओझलर' हा मल्याळम क्राईम-थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट 11 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यामध्ये साउथ स्टार्स जयराम आणि मामूट्टी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
advertisement
3/7
'अब्राहम ओझलर' या सिनेमात शहरात एकामागून एक खून होतात. हे प्रकरण सोडवण्याची जबाबदारी एसीपी अब्राहम ओझलर (जयराम) यांच्याकडे असते. मात्र याचा उलगडा करणं खूप अवघड होतं.
advertisement
4/7
संपूर्ण टीमसोबत 'अब्राहम ओझलर' या खुनाचा तपास करु लागतो. मात्र त्याला सिरियल किलरचा शोध लागत नाही. मग सिनेमाचा क्लायमॅक्स चक्रावून सोडणारा आहे.
advertisement
5/7
या चित्रपटाचे दिग्दर्शन मिधुन मॅन्युएल थॉमस यांनी केलं आहे. सिनेमा रणधीर कृष्णन यांनी लिहिला आहे. विशेष म्हणजे 'अब्राहम ओझलर' हा 2024 सालचा पहिला सुपरहिट मल्याळम चित्रपट आहे. चित्रपटाच्या जबरदस्त सस्पेन्सने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवलं.
advertisement
6/7
Sacknilk च्या रिपोर्टनुसार, 'अब्राहम ओझलर' बनवण्यासाठी मेकर्सनी अंदाजे 10 कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने भारतात 21.03 कोटींची कमाई केली. जगभरात या चित्रपटाची एकूण कमाई 40 कोटी रुपये होती. अशा प्रकारे चित्रपटाने खर्चापेक्षा 4 पट अधिक कमाई केली.
advertisement
7/7
थिएटरमधून प्रदर्शित झाल्यानंतर, 'अब्राहम ओझलर' हा चित्रपट मार्च महिन्यात ओटीटीवर आला. जर तुम्ही चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Suspense Thriller Movie: 2024 चा सुपरहिट सिनेमा, सस्पेन्स असा की डोकं चक्रावेल; बॉक्स ऑफिसवर दणकून केली कमाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल