Gautami Patil: 'माझ्यासोबत जे काही घडलं...', गौतमी पाटीलने सांगितलं होणारा नवरा कसा असावा, लग्नाच्या अटी ऐकून व्हाल शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
advertisement
1/7

मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिच्या नावाची चर्चा असते, जिच्या कार्यक्रमाला लाखांची गर्दी जमते आणि जिच्या एका अदाकारीवर तरुणाई घायाळ होते, ती म्हणजे गौतमी पाटील.
advertisement
2/7
सोशल मीडियापासून ते रुपेरी पडद्यापर्यंत मजल मारणाऱ्या गौतमीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण तिच्या खाजगी आयुष्यात नक्की काय सुरू आहे? गौतमी लग्न कधी करणार? आणि तिचा होणारा नवरा नक्की कसा असावा? या प्रश्नांनी तिच्या चाहत्यांना नेहमीच भंडावून सोडलं होतं. अखेर गौतमीने या सर्व प्रश्नांची उत्तरं अत्यंत दिलखुलासपणे दिली आहेत.
advertisement
3/7
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौतमीने तिच्या लग्नाबद्दलच्या अपेक्षा स्पष्ट केल्या. तिने मांडलेले मुद्दे केवळ तिच्या स्वप्नांबद्दलच नाही, तर तिच्या आजवरच्या संघर्षाबद्दलही बरंच काही सांगून जातात.
advertisement
4/7
गौतमी म्हणाली, "कोणत्याही मुलीला वाटतं तसंच मलाही वाटतं की, माझा जोडीदार मला समजून घेणारा असावा. पण माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे, मी ज्या क्षेत्रात काम करते, त्याचा त्याने आदर करायला हवा. आजवर माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी घडल्या, चांगले-वाईट प्रसंग आले; हे सर्व स्वीकारून जो माझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील, तोच माझा जोडीदार असेल."
advertisement
5/7
गौतमी आपल्या आईच्या खूप जवळ आहे. तिने स्पष्ट सांगितलं की, "मी लग्नानंतरही माझ्या आईला सोडू शकत नाही. जो माझ्या आईलाही आपलंसं करेल, त्याच्याशीच मी संसार थाटेन."
advertisement
6/7
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये गौतमी दिसणार अशा वावड्या उठल्या होत्या. चाहत्यांनाही वाटत होतं की, गौतमीने त्या घरात जाऊन धुमाकूळ घालावा. मात्र, गौतमीने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
7/7
ती म्हणाली, "लोक मला जिथे तिथे हाच प्रश्न विचारतात. पण खरं सांगू तर, मी जास्त दिवस माझ्या घरापासून आणि आईपासून लांब राहू शकत नाही. तिथे राहण्यासाठी खूप संयम लागतो आणि मला माझ्या घरची खूप आठवण येईल, म्हणून सध्या तरी तो विचार नाही."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Gautami Patil: 'माझ्यासोबत जे काही घडलं...', गौतमी पाटीलने सांगितलं होणारा नवरा कसा असावा, लग्नाच्या अटी ऐकून व्हाल शॉक