Girija Oak: एका रात्रीचा रेट विचारणाऱ्यांना गिरिजा ओकचं सणसणीत उत्तर, म्हणाली 'समोर येऊन माझ्याकडे...'
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak: अभिनेत्री गिरिजा ओकला काही दिवसांपूर्वी 'नॅशनल क्रश' चा टॅग मिळाला आणि ती रातोरात सुपरस्टार झाली. मात्र, विकृत मेसेजेस आणि मॉर्फिंगमुळे तिला मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/8

मुंबई: मराठी इंडस्ट्रीतील गुणी अभिनेत्री गिरिजा ओक हिला काही दिवसांपूर्वी 'नॅशनल क्रश' चा टॅग मिळाला आणि ती रातोरात सुपरस्टार झाली. सोशल मीडियावर तिच्या प्रत्येक हालचालींवर नेटकऱ्यांचे लक्ष आहे.
advertisement
2/8
एका बाजूला मिळत असलेला प्रतिसाद समाधानकारक असला तरी, दुसऱ्या बाजूला विकृत मेसेजेस आणि मॉर्फिंगमुळे तिला मोठा धक्का बसला आहे. एका मुलाखतीत गिरिजाने याबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे.
advertisement
3/8
'नॅशनल क्रश' या टॅगमुळे फार काही बदल होणार नाही किंवा काम मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया गिरिजाने एका मुलाखतीत दिली. पण या प्रसिद्धीसोबत तिला अनेक वाईट अनुभवांनाही सामोरे जावे लागले.
advertisement
4/8
गिरिजा एका मुलाखतीत म्हणाली, "रातोरात प्रसिद्धी मिळाल्यानंतर माझे फोटो AI चा वापर करून मॉर्फ केले गेले. काही व्हिडिओमध्ये मी विचित्र गोष्टी करताना दाखवण्यात आले. काही फोटोंमध्ये तर माझे कपडेही गायब होते." या व्हायरल होणाऱ्या बातम्या आणि विचित्र कमेंट्सबद्दल तिच्या कुटुंबाला काही वाटले नाही. उलट, त्यांना हे सर्व खूप मजेशीर वाटल्याचे गिरिजाने सांगितले.
advertisement
5/8
मात्र, सोशल मीडियावर तिला आलेले काही मेसेजेस पाहून तिला अक्षरशः धक्का बसला. हादरवणाऱ्या DMs बद्दल बोलताना गिरिजाने खुलासा केला, "मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो, तू मला फक्त एक संधी दे... एका रात्रीचे किती घेणार? एका तासाचे किती घेणार?" अशा पद्धतीचे असंख्य मेसेज तिला आले.
advertisement
6/8
या व्हर्च्युअल जगातील विचित्र वागणुकीवर बोलताना गिरिजाने तिचे परखड मत मांडले. गिरिजा म्हणाली, "मेसेज करणारे लोक खऱ्या आयुष्यात माझ्याकडे मान वर करूनही बघणार नाहीत. सोशल मीडियावर काहीही बोलणारे हेच लोक खऱ्या आयुष्यात मात्र प्रेमाने आणि आदराने वागतात."
advertisement
7/8
गिरिजाच्या मते, "हा एक विचित्र झोन आहे. या व्हर्च्युअल स्पेसला किती गांभीर्याने घ्यावं यावर मोठा वाद होऊ शकतो." मॉर्फिंगवर बोलताना तिने संमतीचे महत्त्व स्पष्ट केले. "मी पडद्यावर इंटिमेट सीन करणं आणि माझे फोटो मॉर्फ करणं यात फरक आहे. माझ्या परवानगीशिवाय जे केलं जातंय, ते चुकीचं आहे.", असे ती म्हणाली.
advertisement
8/8
गिरिजा ओकने सोशल मीडियाच्या या विपरीत बाजूवर उघडपणे भाष्य करून अनेक अभिनेत्रींना तोंड द्याव्या लागणाऱ्या समस्येकडे लक्ष वेधले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak: एका रात्रीचा रेट विचारणाऱ्यांना गिरिजा ओकचं सणसणीत उत्तर, म्हणाली 'समोर येऊन माझ्याकडे...'