TRENDING:

Govinda-Sunita : गोविंदाने सुनीताला दिला होता 'या' हिरोचा फोटो, डिलिव्हरीपूर्वी ठेवायची उशीखाली! म्हणाला 'माझं मूल...'

Last Updated:
Govinda : या सुपरस्टारवर गोविंदाचे प्रेम इतके होते की, जेव्हा त्याची पत्नी सुनीता आहुजा गर्भवती होती, तेव्हा त्याने पत्नीला त्या अभिनेत्याचा फोटो उशीखाली ठेवायला सांगितला होता.
advertisement
1/9
गोविंदाने सुनीताला दिला होता 'या' हिरोचा फोटो, डिलिव्हरीपूर्वी ठेवायची उशीखाली!
मुंबई: ९० च्या दशकात आपल्या डान्स आणि कॉमेडीने बॉलिवूडवर राज्य गाजवणारा अभिनेता गोविंदा आजही सतत चर्चेत राहतो. त्याच्या कारकिर्दीत एक काळ असा होता जेव्हा एकाच वेळी ५० हून अधिक चित्रपट साईन करून तो इंडस्ट्रीचा किंग बनला होता.
advertisement
2/9
या सुपरस्टारवर गोविंदाचे प्रेम इतके होते की, जेव्हा त्याची पत्नी सुनीता आहुजा गर्भवती होती, तेव्हा त्याने पत्नीला त्या अभिनेत्याचा फोटो उशीखाली ठेवायला सांगितला होता.
advertisement
3/9
गोविंदाचे असंख्य चाहते आहेत, पण गोविंदा मात्र एका दुसऱ्याच सुपरस्टारच्या अभिनयाचा आणि विशेषतः त्यांच्या लूक्सचा मोठा चाहता होता.
advertisement
4/9
गोविंदा ज्या सुपरस्टारला इतके पसंत करायचा, ते दुसरे-तिसरे कोणी नसून बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र आहेत. गोविंदाने अनेकदा मुलाखतींमध्ये याचा खुलासा केला आहे की, त्याला धर्मेंद्र खूप आवडतात. ते एक उत्कृष्ट अभिनेते तर आहेतच, पण गोविंदाला त्यांची पर्सनॅलिटी आणि लूक खूप जास्त आवडतो.
advertisement
5/9
जेव्हा गोविंदा बाबा बनणार होता, तेव्हा त्याला आपलं होणारं मूल धर्मेंद्र यांच्यासारखंच सुंदर दिसावं, असं वाटत होतं. याच इच्छेतून त्याने पत्नी सुनीताला धर्मेंद्र यांचा फोटो उशीखाली ठेवण्यास सांगितला होता, जेणेकरून त्याचा प्रभाव होणाऱ्या बाळावर पडावा.
advertisement
6/9
गोविंदाला धर्मेंद्र यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. १९८७ मध्ये 'दादागिरी' या चित्रपटात हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र दिसले.
advertisement
7/9
त्यानंतर त्यांनी 'पाप को जलाकर राख कर दूंगा', 'लोहा', 'जुल्म हुकूमत', 'रखवाले', 'सच्चाई की ताकत' अशा अनेक चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली.
advertisement
8/9
गोविंदाने आतापर्यंत १३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचा शेवटचा चित्रपट 'रंगीला राजा' फ्लॉप ठरला असला, तरी आता तो पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.
advertisement
9/9
सूत्रांनुसार, गोविंदा लवकरच त्याचा जुना मित्र सलमान खानसोबत पुन्हा एकदा पडद्यावर दिसण्याची शक्यता आहे. 'पार्टनर' चित्रपटानंतर या जोडीला पुन्हा एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही उत्सुक झाले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govinda-Sunita : गोविंदाने सुनीताला दिला होता 'या' हिरोचा फोटो, डिलिव्हरीपूर्वी ठेवायची उशीखाली! म्हणाला 'माझं मूल...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल