Actress Death : ना अपघात ना हार्ट अटॅक, 23 वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू; नेमकं झालं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Actress Death : मनोरंजन विश्वाला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. एका 23वर्षीय अभिनेत्रीचं निधन झालं. तिच्या मृत्यूचं कारण धक्कादायक आहे.
advertisement
1/7

दिवाळीच्या दिवसांत जवळपास चार कलाकारांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हळहळली. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीच्या निधनाची माहिती समोर आली आहे.
advertisement
2/7
वयाच्या 23 व्या वर्षी अभिनेत्रीनं या जगाचा निरोप घेतला आहे. तिच्या निधनाची माहिती मिळताच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/7
इसाबेल टेट असं अभिनेत्री नाव असून ती हॉलिवूडची फेमस अभिनेत्री होती. '9-1-1: नॅशविले' या फेमस सीरिजमधून इसाबेल टेट ही लोकप्रिय झाली होती. 19 ऑक्टोबर रोजी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला.
advertisement
4/7
टॅलेंट एजन्सी मॅकक्रॅ एजन्सी इसाबेल टेटच्या निधनाची माहिती दिली आहे. इसाबेल टेटचा मृत्यू Charcot-Marie-Tooth (CMT) या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजारामुळे झाला आहे.
advertisement
5/7
हा आजार स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम करतो. वयाच्या 13व्या वर्षी अभिनेत्रीला हा आजार असल्याचं समजलं होतं. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते.
advertisement
6/7
ती फार लहान वयापासून या आजाराशी झुंज देत होती. पण अखेर तिची ती झुंज अपयशी ठरली.
advertisement
7/7
इसाबेलनं 2022 साली इन्स्टाग्रामवर तिच्या आजाराबद्दल खुलासा केला होता. तिने लिहिलं होतं की, माझी प्रकृती बिघडत चालली आहे, आणि मला कधीही व्हीलचेअर वापरावी लागू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Death : ना अपघात ना हार्ट अटॅक, 23 वर्षीय अभिनेत्रीचा अचानक मृत्यू; नेमकं झालं काय?