सलमानच्या गर्लफ्रेंडसाठी आपली बायको सोडली, नंतर तिलाही डिवोर्स; क्रिकेटर आता थेट झाला मंत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सलमान खानच्या गर्लफ्रेंडसाठी आपल्या लग्नाच्या बायकोला डिवोर्स देणाऱ्या क्रिकेटर आता राजकारणात उतरला आहे. त्याने नुकतीच मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
advertisement
1/9

मनोरंजन विश्व आणि क्रिकेटचा अनेक वर्षांपासून जवळचा संबंध आहे. अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटशी लग्न केलं आहे. अशीच एक अभिनेत्री जी आधी सलमानची गर्लफ्रेंड होती. पण सलमानसोबत तिचं ब्रेकअप झालं.
advertisement
2/9
सलमानच्या गर्लफ्रेंडसाठी क्रिकेटरने त्याची लग्नाची बायको सोडली. काही वर्षांआधीच त्यांचा डिवोर्सही झाला. पण कोणाचं नशीब कधी पलटेल काही सांगता येत नाही. हा क्रिकेटर आता थेट मंत्री बनला आहे.
advertisement
3/9
तेलंगणात एक नवीन राजकीय उलथापालथ झाली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेऊन काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांनी शपथ घेतली.
advertisement
4/9
काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीबरोबर लग्न केलं. प्रेमात पडले तेव्हा ते विवाहित होते. बायकोला डिवोर्स देऊन त्यांनी संगिताशी लग्न केलं.
advertisement
5/9
त्यावेळी संगिता आणि सलमान खानचं अफेअर सुरू होतं. दोघांचं लग्नही ठरलं होतं. लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या, पण त्यांचं लग्न शेवटच्या क्षणी तुटलं. त्यानंतर सलमानच्या गर्लफ्रेंडला मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपली बायको बनवली.
advertisement
6/9
1985 मध्ये भारतीय संघाचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन एका जाहिरातीचे शूटिंग करत असताना त्यांनी संगिताला पाहिले. ते पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पडले. मोहम्मद अझरुद्दीनचे पूर्वी नौरीनशी लग्न झाले होते. जेव्हा तो संगीताला पहिल्यांदा भेटला तेव्हा विवाहित आणि दोन मुलांचे वडील होते.
advertisement
7/9
1994-95 दरम्यान संगीता आणि मोहम्मद यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. प्रेमसंबंधाच्या बातम्या 1996 साली मध्ये संगीता अझरुद्दीनसोबत इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली आणि तिथेच त्यांचं नातं जगजाहिर झालं. याच वर्षी मोहम्मदने नौरीन यांना डिवोर्स दिला आणि संगीताशी लग्न केले.
advertisement
8/9
अझरुद्दीनशी लग्न करण्यासाठी संगीताने इस्लाम धर्म स्वीकारला. स्वत:चं नाव बदलून तिने आयेशा बेगम असे ठेवलं होतं. पण दोघांचं हे नातं फार काळ टिकलं नाही.
advertisement
9/9
2010 मध्ये ते वेगळे झाले. संगीताने 2014 च्या निवडणुकीत अझरुद्दीनसाठी प्रचार केला होता. बॅडमिंटनपटू ज्वाला बुट्टो ही संगीता आणि अझरुद्दीनच्या वेगळं होण्याचं कारण असल्याचं बोललं जातं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सलमानच्या गर्लफ्रेंडसाठी आपली बायको सोडली, नंतर तिलाही डिवोर्स; क्रिकेटर आता थेट झाला मंत्री