दोन्ही पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर इजा, मरणाच्या दारातून परत आला पवनदीप, अपघाताच्या 7 महिन्यांनी सांगितलं नेमकं काय झालं?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Indian Idol Fame Pawandeep Rajan : 'इंडियन आयडॉल 12' या लोकप्रिय कार्यक्रमाचा विजेता पवनदीप राजन याने नुकतंच एका मुलाखतीत आपल्या अपघाताची संपूर्ण स्टोरी सांगितली आहे. त्याच्या कारची ट्रकला धडक लागली होती. त्यामुळे कार पेटली होती. त्यावेळी तो त्याच कारमध्ये अडकला होता.
advertisement
1/7

'इंडियन आयडॉल 12'चा विजेता पवनदीप राजन सध्या चर्चेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच पवनदीपचा मोठा अपघात झाला होता. या अपघातावर आता त्याने सविस्तरपणे भाष्य केलं आहे. या अपघातातून बरे होण्यास त्याला अनेक महिने लागले. आता मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे.
advertisement
2/7
पवनदीपचा अपघात झाल्यानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त केली जात होती. त्याच्या कारची ट्रकला धडक लागली त्यावेळी तो त्याच कारमध्ये झोपलेला होता. धडक लागल्यानंतर त्याची कार पेटली. त्यावेळी त्याला गाडीतून हलताही येत नव्हतं. कारला आग लागल्यानंतरही तेव्हा त्याच्या मदतीला कोणी येत नव्हतं. नंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढलं.
advertisement
3/7
कार अपघातानंतर पवनदीप राजन पहिल्यांदाच स्पॉट झाला. सलीम-सुलेमान यांच्या पॉडकास्टमध्ये त्याने आपल्या अपघाताबाबत भाष्य केलं. 5 मे 2025 रोजी पवनदीप सकाळी एका कार्यक्रमासाठी अहमदाबादला जाणारी फ्लाइट पकडण्यासाठी उत्तराखंडहून दिल्लीला निघाले होते. पण मुराबादजवळ ड्रायव्हरला झोप लागली आणि कार कार रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. या अपघातात पवनदीप गंभीर जखमी झाला. त्याच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर, उजव्या हाताला आणि डोक्याला दुखापत झाली. पोलिसांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडली.
advertisement
4/7
आपल्या अपघाताबाबत बोलताना पवनदीप म्हणाला,"एक कार्यक्रमासाठी मला खरंतर सकाळी निघायचं होतं. पण काही कारणाने ते शक्य झालं नाही आणि आम्ही संध्याकाळी निघालो. मध्यरात्री 3 वाजता मी कारमध्ये झोपलो होतो. डोळे उघडले तेव्हा अपघात झालेला होता. ड्रायव्हरला गाडी चालवताना झोप लागली आणि कार रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकला जाऊन धडकली आणि पेटली. अपघात झाला त्यावेळी मी पूर्णपणे बधीर झालो होतो. त्यावेळी लोकांनीही मला मदत केली नाही.
advertisement
5/7
पवनदीप म्हणाला,"सुरुवातीला माझ्या मदतीला कोणीही येत नव्हतं. मग पोलिस आले. कारला आग लागली तेव्हा मी आतमध्ये होतो. पोलिसांनी मला बाहेर काढलं. मी किती वेळ आतमध्ये होतो हे मला माहिती नाही. पण शुद्धीवर आलो तेव्हा मी कारच्या बाहेर होतो. मला एका व्यक्तीने रुग्णालयात नेलं. दोन्ही पाय आणि एक हात मोडला होता. मी घरी फोन करुन कुटुंबाला बोलावलं. मला फक्त लवकरात लवकर उपचार करायचे होते. आता सगळं ठीक होतंय".
advertisement
6/7
पवनदीप पुढे म्हणाला,"एक महिना मी डावीकडून उजवीकडेही वळू शकत नव्हतो. आता मी थोडंफार चालू शकतो, त्यामुळे मला खूप आनंद होतो. त्या काळाने मला चालण्याचं महत्त्व शिकवलं. एखादी घटना घडली की तिच्यातून लवकर बाहेर यायला हवं. आनंदी राहा आणि तिला जीवनाचा एक भाग समजा. मला हे सहन करावं लागलं. आता मी थोडंसं चालू लागलो आहे आणि कदाचित महिनाभरात सगळं ठीक होईल".
advertisement
7/7
पवनदीप आपल्या कमबॅकबाबत म्हणाला,"अपघातानंतर मी बिछान्यातच पडलो होतो. मग मी फ्लाइटने मुंबईला आलो, माझा पाय त्याच अवस्थेत होता. मुंबईत मी एक महिना बिछान्यात होतो, मग हळूहळू चालू लागलो. आता हळूहळू गिटार वाजवणंही सुरू केलं आहे. माझा हात थोडा ठीक झाला आहे, तरी अजून पूर्णपणे बरा झालेला नाही".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
दोन्ही पाय फ्रॅक्चर, डोक्याला गंभीर इजा, मरणाच्या दारातून परत आला पवनदीप, अपघाताच्या 7 महिन्यांनी सांगितलं नेमकं काय झालं?