Govardhan Asrani : 2 वर्ष निर्मात्यांच्या दारोदार फिरले, कोणी दिला नाही भाव; इंदिरा गांधींमुळे सुपरस्टार बनले असरानी
- Published by:Minal Gurav
Last Updated:
How Indira Gandhi Helped Asrani During Early Struggles: गोवर्धन असरानी हे अशा स्टार्सपैकी एक होते ज्यांना कोणीही गॉडफादर नव्हते. अभिनय करण्याची इच्छा असल्याने FTII मधून शिक्षण घेतलं. कामसाठी बाहेर निघाले पण पहिल्या दोन वर्षांत त्यांच्या पदरी फक्त निराशाच आली. पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यामुळे त्यांचं आयुष्यच बदललं. त्यांच्या करिअरची गाडी रुळावर आली.
advertisement
1/8

'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं!', 'आधा तीतर, आधा बटेर...', 'हाय! मैं तो मर गया...' 'ये क्या हो रहा है?...' सारख्या डायलॉगमुळे हिंदी चित्रपटसृष्टी त्यांनी नाव कमावलं. उत्कृष्ट कॉमिक टायमिंग आणि संस्मरणीय भूमिकांसाठी सारख्या संवादांनी लोकांना हसवलं. असरानी यांनी एफटीआयमधून शिक्षण घेतलं होतं. पण तिथल्या सर्टिफिकेटवर ते कधीच कमा मिळवू शकले नाहीत.
advertisement
2/8
गोवर्धन असरानी यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. वयाच्या 84व्या वर्षीही ते चित्रपटांमध्ये सक्रिय राहतात. एका आठवड्यापूर्वी त्यांनी अक्षय कुमारसोबत शूटिंग केले आणि अचानक आजारी पडले. त्यांच्या फुफ्फुसात पाणी झालं होतं.
advertisement
3/8
असरानी अभिनयातील त्यांच्या आवडीमुळे पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये गेले. बॉलीवूड ठिकानाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी खुलासा केला की मुंबईत त्यांच्या एफटीआयआय प्रमाणपत्राची किंमत नव्हती. ते म्हणाले, "मी माझे प्रमाणपत्र घेऊन फिरायचो आणि लोक मला हाकलून लावायचे. ते म्हणायचे, 'तुम्हाला अभिनयासाठी प्रमाणपत्र हवे आहे का? मोठे स्टार प्रशिक्षणाशिवाय काम करतात तुम्ही कोण आहात? येथून निघून जा... येथून निघून जा!'"
advertisement
4/8
निराश होऊन ते जयपूरला परतले जिथे त्याच्या त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी कार्पेट व्यवसायात येण्याचा सल्ला दिला. पण अभिनयाच्या त्याच्या आवडीने ते पुन्हा कामाच्या शोधात निघाले. त्यांनी पुन्हा एफटीआयआयमध्ये अर्ज केला आणि त्याच्या पहिल्या बॅचमध्ये एडमिशन घेतलं. पदवीधर झाल्यानंतर, त्याला दोन वर्षे काम मिळाले नाही.
advertisement
5/8
तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री इंदिरा गांधी यांनी त्यांचे नशीब बदलले. असरानी यांनी सांगितलं होतं, एके दिवशी इंदिरा गांधी पुण्याला आल्या. त्या त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री होत्या आणि आम्ही त्यांच्याकडे तक्रार केली. आम्ही त्यांना सांगितले, 'प्रमाणपत्र असूनही, आम्हाला कोणीही काम देत नाही.'
advertisement
6/8
"मग त्या मुंबईत आल्या आणि निर्मात्यांना आम्हाला काम देण्यास सांगितलं. त्यानंतर काम येऊ लागली. जया भादुरींना 'गुड्डी' मध्ये कास्ट करण्यात आले आणि मीही... 'गुड्डी' हिट झाल्यावर लोक एफटीआयआयला गांभीर्याने घेऊ लागले."
advertisement
7/8
'गुड्डी' नंतर, असरानी यांनी 'चुपके चुपके', 'आज की तजा खबर', 'रोटी' आणि 'आज का एमएलए राम अवतार' सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण 1975च्या कल्ट क्लासिक 'शोले' मधील 'गरीब' जेलरची त्यांची भूमिका लोकांच्या मनात अजूनही ताजी आहे. 'मेरा नाम है संतोष, लेकिन लोग मुझे कंगाल कहते हैं' हा त्यांचा डॉयलॉग चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अमर झाला आहे.
advertisement
8/8
असरानी आज आपल्यात नसले तरी त्यांचे शेवटचे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते प्रियदर्शन यांच्या 'भूत बांगला' आणि 'हैवान' या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Govardhan Asrani : 2 वर्ष निर्मात्यांच्या दारोदार फिरले, कोणी दिला नाही भाव; इंदिरा गांधींमुळे सुपरस्टार बनले असरानी