TRENDING:

ईशा केसकरची 'लक्ष्मीच्या पावलांनी' मधून एक्झिट! डोळ्यांना फोड, अन्नातून विषबाधा; म्हणाली, 'त्यावेळी मालिकेच्या टीमने...'

Last Updated:
Isha Keskar Exit Laxmichya Pavlani : लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकरची एक्झिट होणार अशा चर्चा सुरू होत्या. अखेर ईशाने समोर येत तिने मालिका सोडली असल्याचं सांगितलं आहे. मालिका सोडण्यामागचं कारणही तिने सांगितलं.
advertisement
1/7
ईशा केसकरची 'लक्ष्मीच्या पावलांनी' मधून एक्झिट! म्हणाली, 'अन्नातून विषबाधा...'
'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत एक नवा अध्याय सुरू झाला आहे. काही दिवसांआधीच मालिकेत अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरची एन्ट्री झाली आहे. नक्षत्राची एन्ट्री झाल्यानंतर मालिकेची प्रमुख अभिनेत्री ईशा केसकर मालिका सोडणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.
advertisement
2/7
मधल्या काही दिवसांत ईशा म्हणजेच मालिकेतील कला अनेक दिवस मालिकेत नव्हती. पण याबाबत वाहिनीकडून अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. दरम्यान ईशा केसकरनं मालिका सोडली असल्याची माहिती दिली आहे. ईशाने मालिका सोडल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया देत मालिका सोडण्याचं कारणही सांगितलं आहे.
advertisement
3/7
लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका गेली दोन वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. ईशा केसकर या मालिकेतून अनेक महिन्यांनी प्रेक्षकांच्या भेटील आली होती. सलग दोन वर्ष तिने या मालिकेत काम केलं पण अचानक असं काय झालं ज्यामुळे ईशाला ही मालिका सोडावी लागली.
advertisement
4/7
मटाशी बोलताना ईशाने तिचं मालिका सोडण्यामागचं कारण सांगितलं. ईशा म्हणाली, "मी सलग दोन वर्ष काम करत होते. जून महिन्यात माझ्या डोळ्याला फोड आला होता पण मी तसचं शूट करत होते. पण दुखापत वाढत असल्याने डॉक्टरांनी मला आराम घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टर असंही म्हणाले की मी विश्रांती घेतली नाही तर भविष्यात छोटी सर्जरी करावी लागेल. त्यानंतर मी 15-20 दिवस सर्यप्रकाशही बघू शकणार नाही."
advertisement
5/7
ईशा पुढे म्हणाली, "मी संपूर्ण परिस्थितीचा सारासार विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन मालिका सोडण्याचा निर्णय घेतला.  सप्टेंबर महिन्यातच मी मालिका सोडत आहे हे टीमला कळवलं होतं."
advertisement
6/7
मागील काही दिवस ईशा मालिकेतून गायब होती. तेव्हा देखील तिची तब्येत ठीक नसल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली, "मध्यंतरी मला चिकन गुनिया आणि अन्नातून विषबाधा असं दोन्ही झालं होतं. त्यामुळे काही दिवस रजेवर होते. याकाळाक मालिकेच्या टीमनं मला खूप सांभाळून घेतलं.  आता डोळ्याच्या दुखापतीमुळे मी पुन्हा त्यांच्याकडे सुट्टी मागणं मला योग्य वाटत नव्हतं. यामुळे मालिकेच्या कथेवरही परिणाम झाला असता त्यामुळे मी मालिकेतून बाहेर पडायचं ठरवलं."
advertisement
7/7
ईशा शेवटी म्हणाली, "आपण इतकी जीवतोड मेहनत करतो आणि पैसे कमावतो पण त्याचा उपभोग घेत येत नसेल तर काय उपयोग? म्हणून मी थोडं थांबायचं ठरवलं. थोड्या काळाच्या विश्रांतीनंतर मी पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ईशा केसकरची 'लक्ष्मीच्या पावलांनी' मधून एक्झिट! डोळ्यांना फोड, अन्नातून विषबाधा; म्हणाली, 'त्यावेळी मालिकेच्या टीमने...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल