वाकडे-तिकडे दात, विस्कटलेले केस, 21 वर्षीय अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते धक्क्यात! पाहा PHOTOS
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Isha Malviya Transformation: 'बिग बॉस 17' मधून प्रकाशझोतात आलेली ईशा मालवीया आज ग्लॅमरस आणि आत्मविश्वासाठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
advertisement
1/7

'बिग बॉस 17' मधून प्रकाशझोतात आलेली ईशा मालवीया आज ग्लॅमरस आणि आत्मविश्वासाठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण ही झगमगती ओळख तिने एका दिवसात मिळवलेली नाही. सौंदर्य, आत्मविश्वास आणि यशाच्या मागे अनेक वर्षांचा संघर्ष आणि मेहनत लपलेली आहे.
advertisement
2/7
सोशल मीडियावर सध्या ईशा मालवीयाचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये ती एकदम वेगळी दिसत असून लोक तिला पाहून अवाक् झाले. कारण व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तिचे विखुरलेले केस, वाकडे-तिकडे दात पाहून लोक ती ईशा आहे हे पचवायला चाहत्यांसाठी थोडं अवघड आहे.
advertisement
3/7
ईशा मालवीयाचं ‘बदललेलं’ रूप पाहून अनेक प्रश्न विचारू लागले आहेत. काही जण तिला "प्लास्टिकची दुकान" म्हणत आहेत, तर काही तिचं ट्रान्सफॉर्मेशन प्रेरणादायी मानत आहेत.
advertisement
4/7
ईशा मालवीयचा जन्म 2 नोव्हेंबर 2003 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबादमध्ये झाला. तिचे वडील शिक्षण खात्यात नोकरी करतात. लहान वयातच म्हणजे अवघ्या 13व्या वर्षी तिने बाल मॉडेल म्हणून काम सुरू केलं.
advertisement
5/7
ईशाच्या नावावर 'मिस मध्य प्रदेश', 'मिस टीन इंडिया वर्ल्डवाइड', 'मिस एलएनसीटी', 'मिस टीन आयकॉन इंडिया' यांसारखे अनेक किताब आहेत. ईशा फक्त सौंदर्य स्पर्धांपुरती मर्यादित राहिली नाही, तिने डान्स स्पर्धांमध्येही भाग घेतला. 'पत्रिका डान्स के सुपरस्टार', 'बूगी वूगी' यांसारख्या शोमध्ये तिने आपली कला दाखवली.
advertisement
6/7
2021 मध्ये ‘उडारियां’ मालिकेद्वारे तिने टीव्ही जगतात पदार्पण केलं, आणि ‘जस्मिन’ या भूमिकेमुळे ती घराघरात पोहोचली. बिग बॉसनंतर तिची लोकप्रियता वाढली आणि आज तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
advertisement
7/7
दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या तिच्या जुन्या फोटो आणि व्हिडीओमुळे काही लोक तिला ट्रोल करत आहेत. तिच्या लूकमुळे तिला जज करत आहे आणि सर्जरी केल्यामुळे टोमणे देत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
वाकडे-तिकडे दात, विस्कटलेले केस, 21 वर्षीय अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते धक्क्यात! पाहा PHOTOS