TRENDING:

Juhi Chawla Birthday: असं काय झालं की जुही चावलाला लपवावं लागलं तिचं लग्न, Love Story आहे खुपच खास

Last Updated:
Juhi Chawla Birthday: जुही चावलाने 1995 मध्ये जय मेहतासोबत लग्न केले. जुहीचे हे पहिले लग्न होते, तर जय यांचे हे दुसरे लग्न होते. जयशी लग्न करण्यापूर्वी आणि त्या दिवसांमध्ये, ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती.
advertisement
1/11
असं काय झालं की जुही चावलाला लपवावं लागलं तिचं लग्न, Love Story आहे खुपच खास
बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला ही ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला तिचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळं ठेवायला आवडतं. लाइमलाइटपासून दूर राहणंही तिला आवडतं.
advertisement
2/11
शाहरुख खान असो वा आमिर खान, जुहीने तिच्या काळातील सर्व सुपरस्टार्ससोबतच काम केले. तिची त्यांच्याशी चांगली मैत्रीही होती. पण, 1995 मध्ये जेव्हा जुहीने बिझनेसमन जय मेहतासोबत लग्न केले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
advertisement
3/11
जुही चावलाने 1995 मध्ये जय मेहतासोबत लग्न केले. जुहीचे हे पहिले लग्न होते, तर जय यांचे हे दुसरे लग्न होते. जयशी लग्न करण्यापूर्वी आणि त्या दिवसांमध्ये, ती तिच्या करिअरच्या शिखरावर होती.
advertisement
4/11
पण, जय मेहतासोबतचे लग्न गुप्त ठेवण्याचे कारण काय? जुहीने स्वतः यामागचे कारण सांगितले होते.
advertisement
5/11
अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या जुहीची लव्हस्टोरीही खूपच फिल्मी आहे. जुहीने तिच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठ्या असलेल्या जय मेहताशी अतिशय फिल्मी पद्धतीने लग्न केले.
advertisement
6/11
जेव्हा अभिनेत्री जय यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांच्या पहिल्या पत्नी सुजाता बिर्ला यांचे निधन झाले होते. सुजाता यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर जय एकदम एकाकी पडले.
advertisement
7/11
1992 साली जुही तिच्या 'करोबार' सिनेमाचं शूटिंग करत होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन होते, त्यांची जय मेहता यांच्यासोबत चांगली मैत्री होती. शूटिंगदरम्यानच जय आणि जुही पहिल्यांदा भेटले होते. तेव्हा दोघांनी एकमेकांमध्ये विशेष रस दाखवला नाही.
advertisement
8/11
त्यानंतर काही वर्षांनी जेव्हा जुहीला समजले की जयच्या पहिल्या पत्नीचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे, तेव्हा तिचे त्यांच्याबद्दलचे वागणे बदलू लागले. हळू हळू दोघे जवळ येऊ लागले.
advertisement
9/11
जुही आणि जय एकमेकांच्या प्रेमात पडले. अशा स्थितीत दोघांनी लग्ना करण्याचा विचार केला, मात्र त्यानंतर जुहीच्या आईचा एका कार अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर जुही दुःखी राहू लागली. या परिस्थितीत तिला लग्नाबाबत कोणताही निर्णय घेता आला नाही.
advertisement
10/11
या दु:खातून बाहेर पडण्यासाठी जयने जुहीला खूप मदत केली. यानंतर दोघांनी 1995 मध्ये लग्न केले. दोघांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत.
advertisement
11/11
जुहीने सांगितले की, तिने तिचे लग्न इतके दिवस गुपित ठेवले कारण या लग्नामुळे तिच्या करिअरवर परिणाम होऊ नये असे तिला वाटत होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Juhi Chawla Birthday: असं काय झालं की जुही चावलाला लपवावं लागलं तिचं लग्न, Love Story आहे खुपच खास
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल