TRENDING:

खतरनाक खलनायिका! उत्तम अभिनय अन् दिसायला देखण्या, सर्वात शेवटचीच तर नादच खुळा

Last Updated:
टेलिव्हिजनवरील नायिकांपेक्षा प्रेक्षकांमध्ये खलनायिकांची चांगलीच क्रेझ पाहायला मिळते. पाहूयात मराठी मालिकाविश्वातील काही दमदार खलनायिका.
advertisement
1/9
खतरनाक खलनायिका! उत्तम अभिनय अन् दिसायला देखण्या, सर्वात शेवटचीच तर नादच खुळा
मालिका म्हटल्या की त्यातील प्रमुख नायिका ही दिसायला फार सुंदर आणि देखणी असते. पण बऱ्याचदा मालिकेतील खलनायिका नायिकांवर भारी पडतात. मराठी मालिका विश्वातील अशा काही खलनायिका पाहूयात.
advertisement
2/9
आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रूपाली भोसले. संजना या भूमिकेसाठी रूपालीचं खूप कौतुक झालं आहे. तिची स्वत: प्रेझेंट करण्याची स्टाइल चाहत्यांना प्रचंड आवडते. अभिनयातही रूपाली कमाल काम करते.
advertisement
3/9
शुभ विवाह या मालिकेत कुंजिकानं खलनायिका साकारली आहे. कुंजिका दिसायला फारच देखणी असून खलनायिकेची भूमिका तिला शोभून दिसते.
advertisement
4/9
लग्नाची बेडी या मालिकेत अभिनेत्री रेवती लेले हिनं मधुराणी ही भूमिका साकारली आहे. मधुची भूमिका रेवती लिलया पेलली आहे. याआधी रेवती स्वामिनी मालिकेत दिसली होती. तिच्या सौंदर्याचं प्रचंड कौतुक होत असतं.
advertisement
5/9
बिग बॉस फेम अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं अनेकांना तिच्या सौंदर्यानं घायाळ केलंय. तेजस्विनी सध्या तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका ही नकारात्मक भूमिका साकारत आहे.
advertisement
6/9
प्रेक्षकांची लाडकी व्हिलन शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर प्रेमाची गोष्ट या मालिकेत काम करतेय.
advertisement
7/9
आपल्या फिटनेसनं तरूणांना लाजवणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत जबरदस्त खलनायिका साकारली आहे. उत्तम अभिनय आणि त्याला सौंदर्याची जोड असलेली ही खलनायिका प्रेक्षकांनाही प्रचंड आवडते.
advertisement
8/9
रुबाबदार स्वभावाची भुवनेश्वरी साकारणाऱ्या अभिनेत्री कविता लाड यांचंही प्रेक्षक खूप कौतुक करतात. तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत कविता लाड यांनी पहिल्यांदा खलनायिकेची भूमिका साकारली आहे. गेली अनेक वर्ष इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कविता यांचं सौंदर्य आजही तितकंच सुरेख आहे.
advertisement
9/9
मराठी टेलिव्हिजनची सगळ्यात दमदार खलनायिका म्हणून ओळखली जाणारी सर्वांची लाडकी शा लि नी वहिनी कोण विसरेल. अभिनेत्री माधवी निमकर हिनं सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत दमदार खलनायिका साकारली आहे. प्रेक्षकांमध्ये शालिनीची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
खतरनाक खलनायिका! उत्तम अभिनय अन् दिसायला देखण्या, सर्वात शेवटचीच तर नादच खुळा
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल