बालेकिल्ल्यातच सावंतांची कोंडी?
तानाजी सावंत यांचा परंडा हा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, घरातीलच व्यक्तीने बंडखोरी कायम ठेवल्याने सावंतांसमोर मोठे राजकीय संकट उभे राहिले आहे. धनंजय सावंत यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने महायुतीमधील स्थानिक वाद आता टोकाचे झाले आहेत. विशेष म्हणजे, स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार असल्याने त्यांनी काकाला थेट मैदानातून आव्हान दिले आहे.
advertisement
जागावाटपाचे सूत्र ठरले
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत यांचा गट आणि भाजप यांच्यात जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली, जागांचे वाटप झाल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषेदत २ आणि पंचायत समितीमध्ये ४ जागा या धनंजय सावंत यांना देण्यात आल्या आहेत.
स्वतः धनंजय सावंत हे निजाम जवळा जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, राज्यात आणि जिल्ह्यात शिवसेना-भाजप युती एकत्र असताना, परंडा मतदारसंघात मात्र चित्र वेगळे दिसत आहे. तानाजी सावंत यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने सावंतांच्याच पुतण्याला सोबत घेऊन मोठा डाव खेळला आहे.
