माधुरी दीक्षितची ऑनस्क्रीन सून, सिद्धार्थ चांदेकरसोबतच्या बोल्ड सीनने उडवली खळबळ, ती आहे कोण?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Madhuri Dixit Mrs Deshpande Hot Scene: माधुरी दीक्षित सध्या आपल्या 'मिसेज देशपांडे' या सीरिजमुळे चर्चेत आहे. पण या सीरिजमध्ये माधुरीपेक्षा जास्त चर्चा तिच्या ऑनस्क्रीन सूनेची आणि तिने दिलेल्या एका बोल्ड सीनची होत आहे.
advertisement
1/7

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) सध्या आपल्या आगामी 'मिसेज देशपांडे' या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमधील माधुरी दीक्षितचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. पण माधुरीच्या निखळ हास्यापेक्षा तिच्या ऑनस्क्रीन सूनेनं प्रेक्षकांचं जास्त लक्ष वेधून घेतलं आहे.
advertisement
2/7
माधुरी दीक्षितच्या ऑनस्क्रीन सूनेने OTT वर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 'मिसेज देशपांडे' या सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये तिने दिलेल्या 1 मिनिटाच्या बोल्ड सीनची सोशल मीडियावर चर्चा आहे.
advertisement
3/7
'मिसेज देशपांडे' या सीरिजमध्ये माधुरीच्या ऑनस्क्रीन सूनेचं नाव तन्वी असं आहे. तन्वीची भूमिका प्रसिद्ध बी-टाउन अभिनेत्री दीक्षा जुनेजा (Diksha Juneja) हिने साकारली आहे.
advertisement
4/7
'मिसेज देशपांडे' या सीरिजमध्ये तन्वी मुंबई पोलिस इन्स्पेक्टर तेजस (सिद्धार्थ चांदेकर) याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसते. 'मिसेज देशपांडे' या सध्या ओटीटीवर गाजत असलेल्या सीरिजच्या पहिल्याच एपिसोडमध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ चांदेकरसोबत दीक्षा 1 मिनिटांहून अधिक काळ बोल्ड सीन करताना दिसते. सिद्धार्थ आणि दीक्षा लिपलॉक करतानाही दिसतात.
advertisement
5/7
माधुरीची ऑनस्क्रीन सून आणि सिद्धार्थ चांदेकरसोबत बोल्ड सीन देणारी ही अभिनेत्री अर्थात दीक्षा जुनेजा आधी पत्रकार होती. पण नंतर पत्रकारितेला रामराम करत तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 'मिसेज देशपांडे'आधी दीक्षा 'सारे जहां से अच्छा' या सीरिजमध्ये नसीमा हे पात्र साकारताना दिसली होती.
advertisement
6/7
दीक्षा जुनेजा आपल्या वैयक्तिक आयुष्यातही हॉट आणि बोल्ड आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या हॉटनेसने चाहत्यांना घायाळ केलं आहे. दिवंगत अभिनेते ऋषि कपूर यांच्यासोबत दीक्षाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
advertisement
7/7
दीक्षा ही मुळची चंडीगढची आहे. शाळे असल्यापासूनच तिला अभिनय आणि नृत्याची आवड निर्माण झाली होती. शालेय शिक्षणानंतर तिने बीकॉम केलं. शिक्षण पूर्ण करत असतानाच तिने डबिंग आणि कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
माधुरी दीक्षितची ऑनस्क्रीन सून, सिद्धार्थ चांदेकरसोबतच्या बोल्ड सीनने उडवली खळबळ, ती आहे कोण?