TRENDING:

पुण्याची Mrs Deshpande, चविष्ट जेवण बनवून करते आठ खून, 6 एपिसोडची किलर स्टोरी, वाचा First Review

Last Updated:
Madhuri Dixit Mrs Deshpande Review : माधुरी दीक्षित अभिनीत 'मिसेज देशपांडे' ही बहुप्रतीक्षित सीरिज अखेर जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे.
advertisement
1/7
पुण्याची Mrs Deshpande, 6 एपिसोडची किलर स्टोरी, वाचा First Review
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) 'मिसेज देशपांडे' (Mrs Deshpande) या बहुप्रतीक्षित सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज आहे. या सीरिजमध्ये 'धक-धक गर्ल' पहिल्यांदाच सीरियल किलरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. माधुरी एका पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने एका कॉपीकॅट किलरला पकडते.
advertisement
2/7
'मिसेज देशपांडे' ही एका फ्रेंच मालिकेचा रिमेक आहे. 2017 मधील फ्रेंच सायको थ्रिलर ला मांते (The Mantis) या मिनी सीरिजचा रिमेक म्हणजे 'मिसेज देशपांडे'. नागेश कुकुनूर यांनी या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सहा एपिसोडच्या या सीरिजचा प्रत्येक एपिसोड 50 मिनिटांच्या आसपास आहे. माधुरीची 'मिसेज देशपांडे' पाहण्याची ही आहेत पाच प्रमुख कारणे-
advertisement
3/7
नागेश कुकुनूरचं दिग्दर्शन : The Hunt: The Rajiv Gandhi Assassination Case या स्फोटक डॉक्युसीरिजद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांनी आता आणखी एका प्रभावी सीरिजसह कमबॅक केलं आहे. 'मिसेज देशपांडे' ही क्राइम थ्रिलर सीरिज दमदार, विविध शैलींचे मिश्रण असलेली कथा सादर करत प्रेक्षकांना गुंतवून ठेवते.
advertisement
4/7
माधुरी दीक्षित एका नव्या अवतारात : हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या माधुरी दीक्षितने 'मिसेस देशपांडे'मध्ये एक धाडसी आव्हान स्वीकारलं आहे. एका तुरुंगात असलेल्या सिरीयल किलरची भूमिका तिने साकरली आहे. 'धकधक गर्ल'च्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन एक गंभीर, तीव्र आणि थरारक अभिनय या सीरिजमध्ये माधुरीचा पाहायला मिळेल. गूढ, भीती आणि नैतिक गुंतागुंत असलेला हा गडद आणि थरारक अवतार पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
advertisement
5/7
कथा : 'मिसेस देशपांडे' ही एक उत्कंठावर्धक सायको, थ्रिलर सीरिज आहे. पुण्यातील सधन कुटुंबात राहत असलेली मिसेज देशपांडे (माधुरी दीक्षित) खानावळ चालवत असते. चविष्ट जेवण बनवून लोकांचं प्रेम मिळवणारी मिसेज देशपांडे आपल्या विशिष्ट स्टाईलने आठ खून करते. पुढे पोलिस तपासात ती आठही खुनांची कबुली देते तेसुद्धा एका अटीवर. ती म्हणजे स्वत:च्या मुलाला त्याच्या आईविषयी म्हणजेच तिच्याविषयी काहीही कळू द्यायचं नाही. त्यानंतर तिची रवानगी हैदराबाद येथील जेलमध्ये होते. तिथे झीनत फातिमा बदलेल्या नावानं ती 25 वर्षे शिक्षा भोगत असते. अचानक एके दिवी तिच्या स्टाईलमध्ये खून करण्याच्या घटना पुन्हा घडू लागतात. ते पाहून 25 वर्षांपूर्वी मिसेज देशपांडेला जेरबंद करणारा पोलिस अधिकारी अरुण खतरी यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. आणखी पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सीरिजचं पाहावी लागेल.
advertisement
6/7
रोमांचक ट्रेलर : 'मिसेज देशपांडे'चा ट्रेलर खूपच उत्सुकता वाढवणारा होता. ट्रेलरमध्येच माधुरीचं पात्र तुरुंगात असलेलं दाखवण्यात आलं. आरोपीचा शोध घेण्यात पोलिस अपयशी ठरल्यानंतर, या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी ते 'मिसेस देशपांडे'ची मदत घेतात. तगडी स्टारकास्ट आणि रंजक कथानकामुळे ही सीरिज गुन्हे तपासामधील थरार दाखवण्यात यशस्वी ठरली आहे.
advertisement
7/7
तगडी स्टारकास्ट : माधुरी दीक्षित या 'मिसेज देशपांडे' सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहे. सिद्धार्थ चांदेकर, प्रियांशू चॅटर्जी, प्रदीप वेलणकर, दीक्षा जुनेजा हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पुण्याची Mrs Deshpande, चविष्ट जेवण बनवून करते आठ खून, 6 एपिसोडची किलर स्टोरी, वाचा First Review
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल