TRENDING:

ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, काढून घेतलं महामंडलेश्वर पद; नेमकं झालं काय?

Last Updated:
Mamta Kulkarni Expelled From Kinnar Akhada : ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यातून काढून टाकण्यात आलं आहे. वर्षभरापूर्वी तिला मोठा गाजावाजा करत महामंडलेश्वर हा पदभार देण्यात आला होता.
advertisement
1/10
ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, काढून घेतलं महामंडलेश्वर पद
बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीनं इंडस्ट्रीबरोबर भारत सोडला आणि त्यानंतर 2025 च्या महाकुंभच्या निमित्तानं तब्बल 25 वर्षांनी ममता कुलकर्णी भारतात परतली. महाकुंभात हजेरी लावल्यानंतर ममता कुलकर्णीनं थेट किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर होत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
advertisement
2/10
पण आता वर्षभरातच ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे.  आखाड्याचे प्रमुख महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ही माहिती दिली.  शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्यावर भाष्य केल्यामुळे ममताविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
advertisement
3/10
आचार्य महामंडलेश्वर स्वामी प्रा. डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यमाई ममता नंद गिरी म्हणजेच ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्यातून काढून टाकलं आहे. त्यांना आखाड्यातील सर्व जबाबदाऱ्यांपासून देखील तिलं मुक्त केलं आहे.
advertisement
4/10
24 जानेवारी 2025 रोजी महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याने ममता कुलकर्णीची महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती केली होती. त्यानंतर तिला यमाई ममता नंद गिरी असे नवीन नाव दिलं होतं. आचार्य महामंडलेश्वर स्वामी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी यांच्या विधानांशी असहमती व्यक्त करून आणि त्यांच्यापासून स्वतःला दूर करत ही कारवाई केली आहे.
advertisement
5/10
किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सांगितलं की, "शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्याबद्दल ममता कुलकर्णी यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक विधान आहे. त्यांनी किन्नर आखाड्याशी या विषयावर चर्चा केलेली नाही."
advertisement
6/10
"आमचे गुरू स्वामी वासुदेवानंद सरस्वती आणि दिवंगत स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्यात न्यायालयीन वाद झाला होता. असे असूनही त्या बाबींवर आम्हाला काहीही भाष्य करायचे नाही. किन्नर आखाडा या सर्व वादांपासून पूर्णपणे दूर आहे."
advertisement
7/10
लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी पुढे सांगितलं, "तरुण ब्राह्मणांशी जे घडले त्यामुळे आम्हालाही राग आला आहे. जर कोणी कोणत्याही परंपरेवर प्रश्न उपस्थित केले तर आम्हाला वाईट वाटते. म्हणून किन्नर आखाड्याने यमाई ममता नंद गिरी म्हणजेच ममता कुलकर्णी त्यांच्यापासून स्वतःला दूर केले आहे. ती आता किन्नर आखाड्याची सदस्य नाही."
advertisement
8/10
"तिने विविध विषयांवर भाष्य करून वारंवार अस्वस्थ परिस्थिती निर्माण केली होती. किन्नर आखाड्याला कोणताही वाद नको आहे. त्यामुळेच किन्नर आखाड्याने हा निर्णय घेतला आहे."
advertisement
9/10
ममता कुलकर्णीने माघ मेळ्याच्या वादावर म्हटलं होतं की, "10 पैकी 9 महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे आहेत. त्यांच्याकडे शून्य ज्ञान आहे."
advertisement
10/10
ममता कुलकर्णीने माघ मेळ्याच्या वादावर म्हटलं होतं की, "10 पैकी 9 महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे आहेत. त्यांच्याकडे शून्य ज्ञान आहे."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी, काढून घेतलं महामंडलेश्वर पद; नेमकं झालं काय?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल