TRENDING:

फोटोशूटसाठी उतरवले कपडे, अंडरवर्ल्डशी कनेक्शन; 25 वर्षांनी भारतात परतली अभिनेत्री

Last Updated:
mamta kulkarni : 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी 25 वर्षांनी भारतात परत आली आहे. अभिनेत्रीने भारतात येताच तिचा व्हिडिओ शेअर केला आहे. बोल्ड फोटोशूटपासून अंडरवर्ल्ड कनेक्शनपर्यंत ही अभिनेत्री कायमच चर्चेत राहिली.
advertisement
1/8
फोटोशूटसाठी उतरवले कपडे,अंडरवर्ल्डशी कनेक्शन; 25 वर्षांनी भारतात परतली अभिनेत्री
1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खानच्या 'करण-अर्जुन' या सिनेमातील सलमान खानची मैत्रीण आठवतेय? अभिनेत्री ममता कुलकर्णीने ही भूमिका साकारली होती. ममता कुलकर्णीने 1991 साली 'नानबर्गल' या तमिळ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली.
advertisement
2/8
1992 मध्ये 'तिरंगा' आणि 1993 मध्ये 'आशिक आवारा' मधून त्यांना मोठी ओळख मिळाली. त्यानंतर 'वक्त हमारा है', 'क्रांतिवीर', 'करण अर्जुन', 'बाजी' यांसारख्या चित्रपटातून ती इंडस्ट्रीची मोठी स्टार बनली.
advertisement
3/8
तिने 'करण-अर्जुन'मध्ये सलमान खानची गर्लफ्रेंड बिंदियाची भूमिका साकारली होती. तिच्या प्रत्येक मुमेंटवर फिदा होते. ममताने बॉलीवूडच्या प्रत्येक टॉप स्टार अभिनेत्याबरोबर काम केले आहे. हीच ममता मोठ्या पडद्यावरून नाही, बॉलिवूडच्या कॉरिडॉर आणि पार्ट्यांमधूनही गायब झाली.
advertisement
4/8
90 च्या दशकात ती निर्मात्यांची पहिली पसंदी राहिली. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या ममता कुलकर्णीने आपली यशस्वी कारकीर्द पणाला लावली होती. ममता तिच्या कामासोबतच तिच्या बोल्ड स्टाइलमुळेही चर्चेत होती. स्टारडस्ट मॅगझिनच्या फोटोशूटद्वारे ती पहिल्यांदाच प्रकाशझोतात आली होती. यावेळी अभिनेत्रीने टॉपलेस फोटोशूट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने ज्या मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं, ते मॅगझीन ब्लॅकने विकलं गेलं होतं.
advertisement
5/8
ममताला हे फोटोशूट चांगलंच महागात पडलं होतं. बोल्ड फोटोशूट केल्यानंतर तिला 15,000 रुपये दंड भरावा लागला. इतकंच नाही तर ममताच्या या कृतीमुळे संतप्त लोकांनी रस्त्यावर उतरून विरोध सुरू केला आणि अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळू लागल्या.
advertisement
6/8
90 च्या दशकात गुंडांचा रोमान्स वृत्तपत्रांमध्येही चर्चेत होता. अभिनेत्रींसोबतच्या त्याच्या अफेअरच्या अनेक बातम्या येत होत्या. यादरम्यान ममता कुलकर्णी दाऊद इब्राहिमच्या अगदी जवळ असलेल्या छोटा राजनला डेट करत असल्याचे उघड झाले. छोटा राजन दुबईला गेला. काही दिवसांनी ममता कुलकर्णीनेही इंडस्ट्री सोडल्याचे बोलले जात आहे.
advertisement
7/8
काही रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला होता की, ममताने तिचा बॉयफ्रेंड आणि अंडरवर्ल्ड ड्रग माफिया विक्की गोस्वामी या दुबईत राहणाऱ्यासोबत लग्न केले होते. मात्र, ममताने तिच्या लग्नाच्या बातम्यांना नेहमीच अफवा ठरवले.
advertisement
8/8
एकेकाळी अभिनयविश्वातील नावाजलेला चेहरा असलेली ममता कुलकर्णी आता साध्वी बनली आहे. अभिनयाच्या जगाला अलविदा केल्यानंतर त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. 2013 मध्ये त्यांनी 'ऑटोबायोग्राफी ऑफ ॲन योगिनी' या पुस्तकाचे प्रकाशन केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
फोटोशूटसाठी उतरवले कपडे, अंडरवर्ल्डशी कनेक्शन; 25 वर्षांनी भारतात परतली अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल