TRENDING:

बोलो जय श्रीराम! अभिज्ञा भावेने बाप्पासाठी उभारला भव्य देखावा! फोटो असे की बघतच राहाल

Last Updated:
Ganesh Festival : अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांनी गणपतीसाठी सुंदर देखावा उभारला आहे. तिने केलेल्या सजावटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
advertisement
1/7
बोलो जय श्रीराम! अभिज्ञा भावेने बाप्पासाठी उभारला भव्य देखावा! फोटो बघतच राहाल
मुंबई: लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आणि सर्वत्र एक वेगळाच उत्साह संचारला आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे.
advertisement
2/7
पण, या सगळ्यांमध्ये अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुल पै यांनी बाप्पासाठी केलेल्या सजावटीची सध्या खूप चर्चा आहे.
advertisement
3/7
दरवर्षी अभिज्ञा भावे तिच्या घरी गणपतीसाठी एक खास देखावा साकारते. गेल्या वर्षी तिने ‘तिरुपती बालाजी मंदिराचा’ देखावा साकारला होता, तर त्याच्या आधी ‘स्वामी समर्थ अक्कलकोट मंदिराचा’ देखावा साकारला होता. पण यंदाचा देखावा खूपच खास आणि भव्य आहे.
advertisement
4/7
अभिज्ञा आणि मेहुलने यंदा बाप्पासाठी एक सुंदर ‘हनुमान मंदिराचा’ देखावा साकारला आहे. तिने या देखाव्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यात संपूर्ण घरात फुलांची सजावट केलेली दिसत आहे.
advertisement
5/7
अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घराचा दरवाजा पूर्णपणे सजवलेला दिसत आहे. दरवाजाजवळ ‘ॐ हं हनुमते नमो नमः’ हा श्लोक लिहिला आहे, जो सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. त्यासोबतच ‘जय श्री राम’ असं लिहिलेली फुलांची सजावटही करण्यात आली आहे.
advertisement
6/7
तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “राम दूत अतुलित बल धामा || अंजनी पुत्र पवनसुत नामा || यावर्षी आमच्याकडे विराजमान आहेत… रामभक्त पवन पुत्र हनुमान”.
advertisement
7/7
अभिज्ञा आणि मेहुल यांनी बाप्पाच्या स्वागतासाठी केलेली ही सुंदर सजावट पाहून त्यांचे चाहते खूप खुश झाले आहेत आणि त्यांनी कमेंट्समध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यांच्या घरातील बाप्पासाठी खास नैवेद्य बनवलेलाही या फोटोंमध्ये दिसत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बोलो जय श्रीराम! अभिज्ञा भावेने बाप्पासाठी उभारला भव्य देखावा! फोटो असे की बघतच राहाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल