'कोयता घेऊन अंगावर आले आणि...', अभिनेत्रीला वडिलांकडूनच मिळाली भयंकर वागणूक, सांगितला जीवघेणा प्रसंग
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Usha Nadkarni : उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या वडिलांबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
1/8

मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज नाव म्हणजे अभिनेत्री उषा नाडकर्णी. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत त्यांनी साकारलेली कठोर सासूची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
advertisement
2/8
पण, खरं आयुष्य आणि पडद्यावरचं आयुष्य यात खूप फरक असतो, हेच त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या वडिलांबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे, ज्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.
advertisement
3/8
नुकतंच उषा नाडकर्णींनी प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही भयानक गोष्टी सांगितल्या.
advertisement
4/8
त्यांचे वडील वायुसेनेत अधिकारी होते आणि आई शिक्षिका होती. पण, त्यांचे वडील खूप हिंसक आणि रागीट स्वभावाचे होते, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
5/8
उषा नाडकर्णी म्हणाल्या, “जर त्यांना वर्तमानपत्र फाटलेलं दिसलं, तर ते रागाने ते फाडून टाकायचे. आमच्या शाळेची पुस्तकं व्यवस्थित लावली नाहीत, तर ते ती पुस्तकंही फाडून टाकायचे. माझी आई त्यांना समजावून सांगायची की, ‘नवीन पुस्तकं घ्यावी लागतील म्हणून ती फाडू नका’, पण ते ऐकायचे नाहीत.”
advertisement
6/8
उषा नाडकर्णी यांनी त्यांच्या वडिलांच्या हिंसक स्वभावाचा एक भयानक अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “आम्हाला त्यांची खूप भीती वाटायची. एकदा ते माझ्या भावाला तो बेशुद्ध होईपर्यंत मारत होते. मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर ते कोयता घेऊन माझ्या अंगावर धावून आले.”
advertisement
7/8
त्या पुढे म्हणाल्या, “त्यांनी माझ्या हातावर हल्ला केला, मला दुखापत झाली. दुसऱ्या दिवशी माझं नाटक होतं. मी त्याच अवस्थेत नाटक करायला गेले.”
advertisement
8/8
उषा नाडकर्णी यांनी आधीच्या एका मुलाखतीत हेही सांगितलं होतं की, त्यांच्या आई-वडिलांना त्यांनी अभिनय करणं पसंत नव्हतं. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा अभिनयात करिअर करायचं ठरवलं, तेव्हा त्यांच्या आईने त्यांना कपड्यांसह घरातून बाहेर फेकलं होतं. अशा परिस्थितीवर मात करत उषा नाडकर्णी यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वात स्वतःची वेगळी छाप सोडली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कोयता घेऊन अंगावर आले आणि...', अभिनेत्रीला वडिलांकडूनच मिळाली भयंकर वागणूक, सांगितला जीवघेणा प्रसंग