बायको अनुष्का पिंपुटकरपेक्षा सुंदर दिसते मेघन जाधवची वहिनी, नवराही हँडसम हिरो
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Meghan Jadhav Sister-in-Law : अभिनेता मेघन जाधवचं नुकतंच लग्न झालं. त्याची बायको अनुष्का पिंपुटकर ही देखील अभिनेत्री आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मेघनच्या बायकोपेक्षा त्याची वहिनीही खूप सुंदर दिसते. हिचा नवराही हँडसम अभिनेता आहे.
advertisement
1/9

मनोरंजन विश्वात लगीन सराई जोरदार सुरू झाली आहे. 'लक्ष्मी विलास' मालिकेतील जयंत म्हणजेच अभिनेता मेघन जाधव याने नुकतंच लग्न केलं. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरबरोबर त्याने सातफेरे घेतले.
advertisement
2/9
अनुष्का आणि मेघन यांचं लव्ह मॅरेज असून अभिनय करताना दोघे प्रेमात पडले. नुकतंच दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. या लग्नाना दोघांचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी आणि मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
advertisement
3/9
मेघन आणि अनुष्का यांचे लग्नाआधीचे विधी देखील घरीच पार पडले. अनुष्काच्या मेहंदी सोहळ्याला मेघनने हजेरी लावली होती. अनुष्काच्या हातावर लावलेल्या मेहंदीचं त्याने कौतुक केलं. मेघन आणि अनुष्काचा हळदी सोहळा ही अत्यंत साध्या पद्धतीने आनंदाच साजरा झाला.
advertisement
4/9
मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी मेघन आणि अनुष्काच्या लग्नाला हजेरी लावली. दोघांनी लग्नासाठी खास महाराष्ट्रीयन लुक केला होता. अनुष्काने नऊवारी साडी नेसली होती तर मेघनने कुर्ता आणि धोतर. दोघांचा लग्नातील लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरला.
advertisement
5/9
अभिनेत्री अनु्ष्का पिंपुटकर आणि मेघन जाधव यांच्या लग्नात दोघांनी तर सगळ्यांचं लक्ष वेधलं. त्याचबरोबर मेघनच्या वहिनीने देखील सगळ्यांचं लक्ष वेधलं. मेघनची बायको म्हणजेच अनुष्का त्याची अनुरुप वधू आहेच पण त्याची वहिनी देखील दिसायला काही कमी नाही. अनुष्कापेक्षा तिची मोठी जाऊ दिसायला सुंदर आहे.
advertisement
6/9
मितिका शर्मा जाधव असं मेघनच्या वहिनीचं नाव आहे. ती देखील अभिनेत्री असून सोशल मिडिया क्रिएटर आहे. मिथिका ही अमराठी असली तरी उत्तम मराठी बोलते. दिराच्या लग्नासाठी ती खूप उत्सुक होती. मेघनची वहिनी म्हणून तिने सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.
advertisement
7/9
मेघन आणि अनुष्काच्या लग्नात तिने नऊवारी साडी नेसली होती. त्यानंतर रिसेप्शनला तिने खास डिझाइनर ड्रेस वेअर केला होता. लग्नात अनुष्कानंतर मिथिकाने सगळ्याचं लक्ष वेधलं.
advertisement
8/9
मिथिकाचा नवरा म्हणजेच मेघनचा भाऊ आणि अभिनेता मंदार जाधव. मिथिका आणि मंदार यांनी दोन मुलं आहेत. काय होतीस 'तू काय झालीस तू' या मालिकेतून मेघन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
advertisement
9/9
मराठी मालिका विश्वातील हँडसम हंक अभिनेता म्हणून मंदारची ओळख आहे. याआधी मंदार 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होता. ही मालिका संपल्यानंतर मंदार आणि गिरीजाची जोडी पुन्हा एकदा 'तू काय झालीस तू' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बायको अनुष्का पिंपुटकरपेक्षा सुंदर दिसते मेघन जाधवची वहिनी, नवराही हँडसम हिरो