Myra Vaikul Fees : मायरा वायकुळचा सोशल मीडियाला रामराम! ज्या मालिकेमुळे मिळालं फेम त्याच्या एका एपिसोडसाठी किती घ्यायची फी?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Myra Vaikul Fees : बालकलाकार मायरा वायकुळने सोशल मीडियाला रामराम केला आहे. मायरा मालिकेच्या एका एपिसोडसाठी किती फी घ्यायची माहिती आहे का?
advertisement
1/7

मराठी टेलिव्हिजन विश्वात 'माझी तुझी रेशीमगाठ' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली चिमुकली परी म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ. आपल्या गोड हसण्याने, सहज अभिनयाने मायराने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/7
मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे ती केवळ मराठीच नव्हे तर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली. पण आज त्याच सोशल मीडियावरून मायरा गायब झाली आहे. मायराच्या आई-वडिलांनी तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा मोठा निर्णय घेतला.
advertisement
3/7
मायराच्या आई-वडिलांनी मायराचे गमतीशीर आणि गोड व्हिडीओ ती लहान असल्यापासूनच शेअर करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मायराची सोशल मीडियावरील ओळख लहानपणापासूनच तयार झाली होती. मोठी होत असताना मायरा या सगळ्यात रमली आणि कॅमेरा फ्रेंडली. याच व्हिडीओंमुळे तिची ओळख वाढत गेली आणि पुढे तिला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका मिळाली.
advertisement
4/7
ही मालिका प्रचंड हिट ठरली आणि मायराच्या लोकप्रियतेत झपाट्याने वाढ झाली. ज्या मालिकेमुळे मायरा हिट झाली त्या मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती किती फी घ्यायची माहितीये?
advertisement
5/7
माझी तुझी रेशीमगाठ मालिका संपल्यानंतरही मायराचा प्रवास थांबला नाही. तिला काही हिंदी मालिकांमध्येही काम करण्याची संधी मिळाली. मालिकेत काम करताना मायराला एका एपिसोडसाठी सुमारे 10 हजार रुपये मानधन मिळत होतं. हिंदी मालिकेत काम करताना या मानधनात चांगलीच वाढ झाली.
advertisement
6/7
या यशाबरोबरच मायराला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मधल्या काळात तिने दिलेल्या काही मुलाखतींमधील तिचं बोलणं आणि उत्तरं ऐकून काही नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली. गेल्या काही महिन्यांपासून मायरा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत होती. याचा मानसिक परिणाम होऊ नये म्हणून तिच्या आई-वडिलांनी एक मोठा निर्णय घेतला.
advertisement
7/7
मायरा वापरत असलेलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तिच्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचं लक्षात येताच, तिच्या पालकांनी मायराचं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलिट करण्याचा निर्णय जाहीर केला. नुकतंच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट पूर्णपणे हटवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Myra Vaikul Fees : मायरा वायकुळचा सोशल मीडियाला रामराम! ज्या मालिकेमुळे मिळालं फेम त्याच्या एका एपिसोडसाठी किती घ्यायची फी?