Nagarjuna On Sobhita: घराच्या नव्या सूनेवर नागार्जुनही झाले खूश, कौतुकाचे पूल बांधत म्हणाले, "माझ्या मुलाच्या आधी मी..."
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Nagarjuna Statement On Sobhita: नागार्जुन यांचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली नवीन सून शोभिताबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
advertisement
1/7

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता यांचा विवाह डिसेंबर महिन्याच्या ४ तारखेला पार पडला. गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या या जोडप्याने याच महिन्यात ४ डिसेंबर रोजी लग्न केले. तेव्हापासून आजपर्यंत हे कपल चर्चेत आहे.
advertisement
2/7
नुकतंच हे जोडपे एका खोट्या न्यूजमुळे चर्चेत आले होते. सोशल मीडियावर अशी बातमी होती की, लग्नाच्या वेळी नागा चैतन्यचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी नागा चैतन्य आणि शोभिता या दोघांमध्ये घटस्फोटासाठी करार तयार केला होता आणि त्यावर दोघांनी स्वाक्षरीही केली होती, मात्र ही बातमी खोटी होती.
advertisement
3/7
आता नागार्जुन यांचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी आपली नवीन सून शोभिताबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या हवाल्याने TOI मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, नागार्जुन यांनी सांगितले की, नागा चैतन्यच्या आधी ते शोभिताला ओळखत होते.
advertisement
4/7
या मुलाखतीत त्यांनी शोभिताबद्दल सांगितले की, ती खूप सुंदर मुलगी आहे. कोणीही समजू शकतो की, तिने ही पातळी गाठण्यासाठी कठोर परिश्रम केले आहेत. नागार्जुन म्हणतात की, नागा चैतन्य आणि शोभिता आता खूप आनंदी आहेत. त्यांचा आनंद पाहून मला आनंद होतो. शोभिता त्याच्या आयुष्यात आली याचा खूप आनंद असल्याचं चैतन्य सांगतो.
advertisement
5/7
एवढेच नाही तर नागार्जुन यांनी हेही सांगितले की, नागा चैतन्यच्या लग्नापूर्वी त्यांनी 'गुडाचारी' चित्रपट पाहिल्यानंतर शोभिताचे फोनवर अभिनंदन केले होते. त्यांनी तिला हैदराबाद येथील आपल्या घरी येण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगितले. याआधी शोभिताने एका मीडिया मुलाखतीतही सांगितले होते की, ती २०१८ मध्ये नागार्जुन यांच्या घरी गेली होती.
advertisement
6/7
शोभिताबद्दल ते पुढे म्हणतात, "ती एक आश्चर्यकारकपणे अद्भुत आणि सुंदर व्यक्ती आहे जी स्वतःच्या अटींवर आयुष्य जगते. ती ज्या प्रकारे तिचे प्रकल्प काळजीपूर्वक निवडते त्यावरून तिचा आत्मविश्वास आणि समाधान दिसून येते."
advertisement
7/7
आनंद व्यक्त करताना नागार्जुन म्हणाले, ''मी शोभिता आणि चैतन्य यांच्यात खूप निरोगी नाते पाहतो आणि मी त्या दोघांसाठी, विशेषतः नागा चैतन्यसाठी खूप आनंदी आहे.''
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nagarjuna On Sobhita: घराच्या नव्या सूनेवर नागार्जुनही झाले खूश, कौतुकाचे पूल बांधत म्हणाले, "माझ्या मुलाच्या आधी मी..."