Girija Oak: 'महाराष्ट्रात कुठेही असेन तरीही मी तिथे जातेच', काय आहे 'नॅशनल क्रश' गिरिजा ओकचं नागपूर कनेक्शन?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Girija Oak: ज्या गिरिजा ओकवर संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे, तिचं मन मात्र नागपूरच्या पुडाच्या वडीवर म्हणजेच सांबरवडीवर अडकलेलं आहे.
advertisement
1/9

सोशल मीडियावर निळ्या साडीतील एका लूकने रातोरात नॅशनल क्रश ठरलेली मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘चना पोहा विथ नितीनजी’ या हटके कार्यक्रमात गिरिजा पाहुणी म्हणून आली होती.
advertisement
2/9
पण ही केवळ एक औपचारिक मुलाखत नव्हती, तर ते गिरिजाच्या तिच्या लाडक्या जागेशी असलेल्या नात्याचं एक भावनिक संमेलन होतं. नागपूरच्या मातीशी तिचं नातं किती घट्ट आहे, हे तिच्या गप्पांतून प्रकर्षाने जाणवलं.
advertisement
3/9
ज्या गिरिजा ओकवर संपूर्ण महाराष्ट्र फिदा आहे, तिचं मन मात्र नागपूरच्या पुडाच्या वडीवर म्हणजेच सांबरवडीवर अडकलेलं आहे. नितीनजींशी गप्पा मारताना तिने कबूल केलं की, "मी जगाच्या पाठीवर कुठेही असले, तरी नागपूरची सांबरवडी, तर्री पोहे आणि गोळाभात पाहिला की माझ्या तोंडाला पाणी सुटतंच!"
advertisement
4/9
डॉ. गिरीश ओक आणि पदमजा पाठक यांची मुलगी असूनही गिरिजाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, पण नागपूरकर तिला आजही त्यांच्या घरची मुलगी मानतात.
advertisement
5/9
गिरिजाचा जन्म नागपूरचाच. तिची आई पद्मश्री फाटक या नागपूरच्या असल्यामुळे गिरिजाचं बालपण आजोळी मामा-मामी आणि भावंडांच्या घोळक्यात गेलं. उरण, सांगली आणि मुंबई अशा अनेक शहरांमध्ये तिचं शिक्षण झालं असलं, तरी सुट्ट्या लागल्या की गिरिजा थेट नागपूरला यायची.
advertisement
6/9
एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत ती नागपूरला असताना खूप आजारी पडली होती, त्यामुळे नंतर तिने दिवाळीच्या सुट्टीत नागपूरला येणं पसंत केलं. ती म्हणते, "अभिनय आणि नृत्याच्या व्यापात आता येणं कमी होतं, पण नागपूरच्या अंगणांमध्ये खेळलेले ते दिवस आजही हृदयात साठवलेले आहेत."
advertisement
7/9
गिरिजा केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती एक सुगरण आहे. कामाच्या कितीही व्यापात असली, तरी आपल्या मुलाला क्वालिटी टाईम देणं ती कधीच विसरत नाही. मुलाचा अभ्यास असो वा डबा, गिरिजा सर्व काही स्वतः पाहते.
advertisement
8/9
तिची अभिनयातील कारकीर्दही तितकीच रंजक आहे. आईच्या मैत्रिणीच्या मुलाच्या ऑडिशनला गेलेली चिमुरडी गिरिजा, आपल्या चुणचुणीत स्वभावामुळे चक्क स्वतःच एका जाहिरातीसाठी निवडली गेली आणि तिथूनच तिचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.
advertisement
9/9
गडकरींच्या या कार्यक्रमात गिरिजाने केवळ तिच्या करिअरवरच नाही, तर नागपूरच्या बदलत्या स्वरूपावरही भाष्य केलं. नागपूरचं जेवण आणि तिथली आपुलकी या गोष्टी तिला आजही आकर्षित करतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Girija Oak: 'महाराष्ट्रात कुठेही असेन तरीही मी तिथे जातेच', काय आहे 'नॅशनल क्रश' गिरिजा ओकचं नागपूर कनेक्शन?