किडनी फेल्युअर नाही, तर 'हे' होते सतीश शहांच्या मृत्यूचे खरे कारण; ऑनस्क्रीन मुलाने सांगितली एकूण-एक गोष्ट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Satish Shah Death Real Reason : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या मृत्यूचे कारण किडनी निकामी झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा आणि अभिनेता राजेश कुमारने त्यांच्या निधनाचे खरे कारण सांगून सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
1/6

मुंबई: बॉलिवूडमधील दिग्गज विनोदी ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले. ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूचे कारण किडनी निकामी झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा आणि अभिनेता राजेश कुमारने त्यांच्या निधनाचे खरे कारण सांगून सर्वांना मोठा धक्का दिला आहे.
advertisement
2/6
सतीश शाह यांचे मॅनेजर रमेश कडातला यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना शेवटच्या क्षणांची हृदयद्रावक कहाणी सांगितली. रमेश यांनी सांगितले की, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते २.४५ च्या दरम्यान सतीश शाह जेवण करत होते.
advertisement
3/6
रमेश म्हणाले, "त्यांनी एक घास तोंडात घेतला आणि त्याच क्षणी ते अचानक कोसळले आणि शुद्ध हरपली." त्वरित हिंदुजा रुग्णालयात संपर्क साधला गेला, पण अ‍ॅम्ब्युलन्स यायला जवळपास अर्धा तास लागला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
advertisement
4/6
सतीश शाह यांच्या निधनानंतर सर्वत्र किडनी निकामी झाल्यामुळे सतीश यांचे निधन झाल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, 'साराभाई व्हर्सेस साराभाई' या लोकप्रिय मालिकेत सतीश यांच्या मुलाची भूमिका साकारणारे आणि खऱ्या आयुष्यातही त्यांना पित्याप्रमाणे मानणारे राजेश कुमार यांनी ही माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.
advertisement
5/6
बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राजेश कुमार म्हणाले, "सतीश काका घरी लंच करत असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचा मृत्यू किडनी फेल्युअरने झाला, या बातम्यांमध्ये तथ्य नाहीये. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, त्यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले होते. त्यांना अचानक कार्डियाक अरेस्ट आला आणि यामुळेच त्यांचे निधन झाले."
advertisement
6/6
'साराभाई व्हर्सेस साराभाई'मध्ये बाप-लेकाची भूमिका साकारल्यापासून राजेश कुमार आणि सतीश शाह यांच्यात खूप जवळचे नाते होते. त्यामुळे सतीश शाह यांच्या अंतिम संस्कार आणि प्रार्थना सभेमध्ये राजेश कुमार खूप भावूक झालेले दिसले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
किडनी फेल्युअर नाही, तर 'हे' होते सतीश शहांच्या मृत्यूचे खरे कारण; ऑनस्क्रीन मुलाने सांगितली एकूण-एक गोष्ट