TRENDING:

Almond Health Benefits : बदाम खावं असं म्हणतात, पण त्याचे फायदे काय? माहित पडलं तर आजपासूनच कराल खायला सुरुवात

Last Updated:
आता अनेकांना हे तर माहित आहे की बदाम रोज खाल्लं जातं किंवा खाल्लं पाहिजे, पण त्याचा शरीराला फायदा काय होतो हे अनेकांना माहित नाही. चला त्याबद्दल जाणून घेऊ
advertisement
1/9
बदाम खाण्याचे फायदे काय? माहित पडलं तर आजपासून कराल खायला सुरुवात
बदाम म्हणजेच Almond हे एक साधं पण अतिशय पोषक ड्रायफ्रुट आहे. अनेक घरांत ते फक्त सणासुदीच्या प्रसंगी किंवा गोड पदार्थात वापरले जातात. बदाम हे “नट्स” मध्ये मोडतात. म्हणजेच तेलकट असणारे फळ, ज्याचं तेल देखील काढलं जातं, ज्याचा वापर ब्युटी प्रोडक्ट्समध्ये केले जातात. पण तुम्हाला माहितीय का की रोजच्या आहारात योग्य पद्धतीने त्याचा समावेश केला, तर ते आपल्या आरोग्यासाठी अप्रतिम ठरू शकतात.
advertisement
2/9
आता अनेकांना हे तर माहित आहे की बदाम रोज खाल्लं जातं किंवा खाल्लं पाहिजे, पण त्याचा शरीराला फायदा काय होतो हे अनेकांना माहित नाही. चला त्याबद्दल जाणून घेऊ म्हणजे आतापासून तुम्हाला दररोज बदाम खाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि ते कसे खावेत हे देखील जाणून घेऊयात.
advertisement
3/9
बदामात व्हिटॅमिन E, प्रोटीन, फाइबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि अनेक आवश्यक खनिज आणि मोनोअनसॅच्युरेटेड आमि पॉलीअनसॅच्युरेटेड चर साठा असतात. उदाहरणार्थ: त्यात असलेले “चांगले चर ” (unsaturated fats) हे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यात आणि हृदयासाठी लाभदायी ठरू शकतात.
advertisement
4/9
त्याशिवाय, नियमित बदाम खाल्ल्याने रक्तातील शर्करेवर म्हणजे डायबिटिज नियंत्रण मिळण्याची शक्यता आहे.त्वचेसाठी, मेंदूसाठी आणि पचनासाठीही त्यातील घटक उपयुक्त ठरतात.
advertisement
5/9
कसा, कधी आणि किती खावा?बदाम खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी उपाशी पोटी खावेत. म्हणजे अगदी उठल्या उठल्या बदाम खाल्लेलं उत्तम.पण त्यासाठी रात्री पाण्यात बदाम भिजत ठेवावे आणि साल काढून सकाळी खावे. यामुळे बदामचे आपल्याला असंख्य फायदे मिळतात, शिवाय पचनासाठी सुलभ होते. पण बदामला चांगल्याप्रकारे चावणे हेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे दात आणि हिरड्यांना नुकसान नाही आणि पोषक तत्वांचा उत्तम शोषण होतो.
advertisement
6/9
भिजवलेले बदाम घरी दही किंवा दूधमध्ये मिक्सरला वाटून देखील तुम्ही खाऊ शकता, हे देखील चांगला पर्याय आहे जेणेकरून पोषक घटक अधिक प्रभावीपणे मिळतात.
advertisement
7/9
तज्ञांच्या मते दररोज सुमारे 5 ते 7 बदाम हे दिवसाला पुरेसे असतात.. जास्त खाल्ल्याने वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो कारण बदाम हा तेलकट पदार्थ देखील आहे.मात्र खूपच कमी करता नका नेमके प्रमाण महत्वाचे आहे.
advertisement
8/9
कोणत्या गोष्टींवर लक्ष द्यावे?शरीरासाठी चांगलं म्हणून सरसकट खाऊ नये. बदामात ऊर्जा (कॅलॉरी) जास्त असू शकतात, त्यामुळे प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे.तसेच, भिजवलेल्या किंवा शुद्ध पध्दतीने तयार केलेल्या बदामांचा वापर करा. खराब नट्समुळे समस्या होऊ शकतात.जर आपण रक्तपात किंवा विशिष्ट रक्तदाबाचे औषध घेत असाल, किंवा पचनसंवाद संबंधित समस्या असतील, तेव्हा डॉक्टरशी चर्चा करा आणि सल्ला घ्या.
advertisement
9/9
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी त्याची पुष्टी करत नाही. आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Almond Health Benefits : बदाम खावं असं म्हणतात, पण त्याचे फायदे काय? माहित पडलं तर आजपासूनच कराल खायला सुरुवात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल