Krushna Abhishek: 'आता वेळ आली आहे', कृष्णा अभिषेक सोडणार 'लाफ्टर शेफ्स', नव्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Krushna Abhishek Viral Post: चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या कृष्णाने काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे कृष्णाच्या फॅन्सना धक्का दिला आहे.
advertisement
1/6

मुंबई : देशातील सर्वात लोकप्रिय असलेल्या कॉमेडी कलाकारांमध्ये गोविंदाचा भाचा कृष्णा अभिषेकचं नाव आवर्जून घेतलं जात. गेली कित्येक वर्ष कृष्णा त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. सध्या कृष्णा लाफ्टर शेफ्स आणि कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शोचा भाग आहे.
advertisement
2/6
दरम्यान, चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या कृष्णाने काही तासांपूर्वीच सोशल मीडियावर अशी एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे कृष्णाच्या फॅन्सना धक्का दिला आहे. कृष्णाने त्याच्या पोस्टमध्ये तो लवकरच काहीतरी मोठं करणार असल्याचं दिसतंय.
advertisement
3/6
कृष्णाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक गूढ पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने लिहिलंय, "जिंदगी में जब तक सही बॅलन्स ना हो, मजा नही आता. टाईम फॉर अ चेंज." याचाच अर्थ असा की, आयुष्यात जोपर्यंत योग्य संतुलन नसतं, तोपर्यंत मजा येत नाही. आता बदलाची वेळ आली आहे.
advertisement
4/6
इतकंच नाही, तर पोस्टच्या कॅप्शनमध्ये कृष्णाने लिहिलंय, "दिल और दिमाग थाम लो." कृष्णाचा मेसेज अतिशय लहान असला, तरीही या मेसेजने त्याच्या चाहत्यांची झोप उडवली आहे. ही पोस्ट त्याच्या करिअरमधील बदलाचा संकेत आहे की वैयक्तिक आयुष्यातील कोणता मोठा निर्णय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
advertisement
5/6
कृष्णाने ही पोस्ट शेअर करताच कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी आपल्या कमेंट्समधून त्यांचे विचार मांडले आहेत. काहींना असं वाटतंय की, कृष्णा सध्या सुरू असलेला 'लाफ्टर शेफ्स ३' हा शो सोडून दुसऱ्या कोणत्यातरी मोठ्या प्रोजेक्टकडे वळणार आहे.
advertisement
6/6
काहींना असंही वाटतंय की, कृष्णाच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये काही मोठे बदल होणार आहेत का? तथापि, या सर्व चर्चांवर कृष्णाने अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे गूढ अजूनही कायम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Krushna Abhishek: 'आता वेळ आली आहे', कृष्णा अभिषेक सोडणार 'लाफ्टर शेफ्स', नव्या पोस्टचा नेमका अर्थ काय?