TRENDING:

Crime Series : दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, क्राइम सीरिज पाहायच्यात! Netflix वर आहे जबरदस्त कॉन्टेंट, पाहून अंगावर शहारे येतील

Last Updated:
Ott Web Series : क्राइम थ्रिलर वेब सीरिजचं वेड सध्या वाढत चाललं आहे.  आम्ही तुम्हाला अशा सीरिजबद्दल सांगणार आहोत ज्याचे सगळे एपिसोड्स पाहिल्याशिवाय तुम्ही शांत बसणार नाहीत. 
advertisement
1/9
दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, क्राइम सीरिज पाहायच्यात! Netflix वर जबरदस्त कॉन्टेंट
क्राइम आणि थ्रिलर सिनेमांचे चाहते असाल तर एक अशी वेब सीरिज तुम्हाला सांगणार आहोत जी खुनांची रहस्ये, सस्पेन्स आणि ट्विस्टने भरलेली आहेत. या सीरिज तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.  वास्तविक घटनांवर आधारित असोत किंवा काल्पनिक प्रकरणांची चौकशी असो, प्रत्येक एपिसोडमध्ये कमालीचा सस्पेन्स पाहायला मिळेल.  
advertisement
2/9
ही वेब सिरीज टॉप-रेटेड सीरिजपैकी एक आहे. यात सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी आणि कुब्रा सैत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
advertisement
3/9
विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित, ही वेब सिरीज मुंबईच्या अंडरवर्ल्ड, भ्रष्टाचार आणि एका गुंडाला (नवाजुद्दीन सिद्दीकी) पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची (सैफ अली खान) स्टोरी आहे. IMDBवर टॉप 50 भारतीय वेब सिरीजच्या यादीत 'सेक्रेड गेम्स' अव्वल स्थानी आहे.
advertisement
4/9
किलर सूप-  जेव्हा क्राइम सिरीजची चर्चा होते तेव्हा हे पहिले नाव येते ते किलर सूप या सीरिजचं. कमाल सस्पेन्स आणि गूढतेसाठी लोकप्रिय असलेली ही सीरिज आहे. 'किलर सूप'चा प्रत्येक भाग प्रेक्षकांना नवीन ट्विस्ट आणि टर्सनी मोहित करतो. 
advertisement
5/9
दिल्ली क्राइम -  या सीरिजमधील सस्पेन्स आणि दाखवण्यात आलेली गुन्हेगारी प्रेक्षकांना खिळून ठेवते. 2012 च्या निर्भया प्रकरणाची कथा यात दाखवण्यात आली होती. ज्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले.
advertisement
6/9
या मालिकेत या भयानक घटनेचे अत्यंत संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणाने चित्रण केले आहे. शेफाली शाहने तिच्या व्यक्तिरेखेत जीव ओतला. आजही लोक या सस्पेन्सबद्दल कौतुक करतात आणि त्याचे कौतुक करतात. 
advertisement
7/9
हाउस ऑफ सीक्रेट्स - द बुराड़ी डेथ्स :  ही 3 भागांची डॉक्युमेन्ट्री सीरिज आहे. 2018मध्ये दिल्लीतील बुरारी प्रकरणावर आधारित ही सीरिज आहे. 
advertisement
8/9
एकाच कुटुंबातील 11 सदस्यांनी आत्महत्या केली होती. ही सीरिज कुटुंबाच्या सामूहिक श्रद्धा, मानसिक स्थिती आणि अशी काही रहस्ये समोर आणते ज्यामुळे प्रेक्षक हादरून जातात.
advertisement
9/9
क्राइम बीट -  नेटफ्लिक्सची 'क्राइम एक्सप्रेस' ही सीरिज क्राइम थ्रिलर कंन्टेट पाहणाऱ्यांसाठी एक  उत्तम पर्याय आहे. मालिकेतील प्रत्येक ट्विस्ट प्रेक्षकांना विचारात पाडतो.  
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Crime Series : दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, क्राइम सीरिज पाहायच्यात! Netflix वर आहे जबरदस्त कॉन्टेंट, पाहून अंगावर शहारे येतील
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल