New On Netflix : 15 ते 30 ऑक्टोबर नेटफ्लिक्सवर पैसा वसूल Entertainment! रिलीज होत आहेत जबरदस्त मूव्ही अन् वेब सीरिज, ही घ्या लिस्ट
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Upcoming Films and Web Series on Netflix : नेटफ्लिक्सवर 15 ते 30 ऑक्टोबरदरम्यान जबरदस्त चित्रपट आणि वेब सीरिज रिलीज होत आहेत. जाणून घ्या कधी काय रिलीज होणार. त्यामुळे या महिन्यात नेटफ्लिक्सप्रेमींचा पैसा वसून होणार हे नक्की.
advertisement
1/7

द डिप्लोमॅट सीझन 3 : 'द डिप्लोमॅट सीझन 3' ही एक राजकीय थरार असणारी वेब सीरीज आहे. केरी रुसैल या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत. तर रुफस सेवेल, डेविड ग्यासी, अली आह्य आणि रोरी किन्नियर हे कलाकारही या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 16 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर ही सीरिज स्ट्रीम होणार आहे.
advertisement
2/7
रोमँटिक्स अॅनॉनिमस :'रोमँटिक अॅनॉनिमस' ही सीरिज 2010 मध्ये आलेल्या फ्रेंच-बेल्जियम रोमँटिक विनोदी चित्रपटावर आधारित आहे. त्सुकिकावा यांनी ही सीरिज दिग्दर्शित केली आहे. या सीरिजमध्ये शुन ओगुरी, हान ह्यो-जू आणि युरी नाकामुरा प्रमुख भूमिकेत आहेत. 16 ऑक्टोबरपासून ही सीरिज प्रेक्षकांना पाहता येईल.
advertisement
3/7
द टाइम डॅट रिमेन्स : 'द टाइम डॅट हा एक रोमँटिक चित्रपट आहे. यामध्ये कार्लो एक्विनो, बिंग पिमेंटेल आणि ब्यूटी गोंजालेज महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 16 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर ही सीरिज रिलीज होत आहे.
advertisement
4/7
अ‍टॅक 13 : 'अटॅक 13' हा एक हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे. तवीवत वंथाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. एक छळ झालेला विद्यार्थी आत्महत्या करतो आणि नंतर भूत बनून बदला घेतो, असं या चित्रपटाचं कथानक आहे. तारिसा प्रीचतांगकिट आणि निचापालक थोंगखम हे स्टार्स या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. 21 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
advertisement
5/7
नोबडी वॉन्ट्स दिस सीझन 2 : 'नोबडी वॉन्ट्स दिस सीझन 2'मध्ये क्रिस्टन बेल, एडम ब्रॉडी आणि लीटन मेस्टर दिसणार आहेत. या सीरिजची निर्मिती एरिन फोस्टर यांनी केली आहे. 23 ऑक्टोबरला ही सीरिज स्ट्रिम होत आहे.
advertisement
6/7
अ हाऊस ऑफ डायनामाईट : 'अ हाऊस ऑफ डायनामाईट' हा एक अमेरिकन थ्रिलर नाट्य असणारा चित्रपट आहे. कॅथरीन बिगेलो यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. इद्रिस एल्बा, रेबेका फर्ग्युसन आणि गेब्रियल बासो हे कलाकार या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत असून 23 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.
advertisement
7/7
द विचर सीझन 4 : 'द विचर सीझन 4' ही एक हॉरर सीरिज आहे. 30 ऑक्टोबरला ही सीरिज ओटीटीवर येत आहे. चौथ्या सीझनमध्ये गेराल्टच्या भूमिकेत हेनरी कैविलच्या जागी हेम्सवर्थ दिसणार आहेत. फ्रेया एलन, आन्या चालोत्रा आणि लॉरेंस फिशबर्न या सीरिजचा महत्त्वाचा भाग असणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
New On Netflix : 15 ते 30 ऑक्टोबर नेटफ्लिक्सवर पैसा वसूल Entertainment! रिलीज होत आहेत जबरदस्त मूव्ही अन् वेब सीरिज, ही घ्या लिस्ट